शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election Results: काँग्रेसनं याआधीही 'असाच' केला होता भाजपाचा 'गेम', पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 12:24 IST

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, पण....

नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, पण काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी करत त्यांची खुर्ची खेचण्याची खेळी केलीय. पण, काँग्रेसनं भाजपाला असाच धक्का २०१३ मध्येही दिला होता. त्यामुळे त्या निवडणुकीत 'टॉप' येऊनही सत्तास्थापनेवेळी ते 'फ्लॉप' ठरले होते. 

कर्नाटकचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भाजपाचंच 'शाही तंत्र' वापरून काँग्रेसनं त्यांची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोवा, मेघालय, मणिपूरमध्ये भाजपानं जे राजकारण केलं, त्याचा 'बदला' काँग्रेस कर्नाटकात घेतोय, असंही बोललं जातंय. पण, हे जोडाजोडीचं आणि फोडोफोडीचं राजकारण अजिबातच नवं नाही. ते भाजपानं शोधलंय असं तर अजिबातच नाही. उलट, भाजपानं गोवा, मेघालय, मणिपूरमध्ये जे केलं, तेच काँग्रेसनं २०१३च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालांनंतर केलं होतं.   

दिल्लीतील ७० जागांपैकी ३२ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आम आदमी पार्टीनं २८ जागा जिंकल्या होत्या. भाजपाने काही हालचाली करायच्या आधीच, आठ जागा जिंकलेल्या काँग्रेसनं 'आप'ला बाहेरून पाठिंबा जाहीर करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. अर्थात, हे सरकार फक्त ४९ दिवस टिकू शकलं होतं. त्यानंतर, दिल्लीत पुन्हा निवडणूक झाली होती आणि त्यात 'आप'नं मुसंडी मारली होती. 

कर्नाटकमधील मतमोजणीत १०४ जागांपर्यंत पोहोचलेल्या भाजपाला बहुमतासाठी आठ आमदारांची गरज आहे. याउलट, काँग्रेस (७८) आणि जेडीएसचं (३७) एकत्रित संख्याबळ ११५ होतंय. दोघांनीही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर, राजकीय घडामोडींना वेग आलाय. आत्ताच्या घडीला काँग्रेस-जेडीएसचं पारडं जड असलं, तरी काहीही घडू शकतं. 

दरम्यान, निवडणूक निकालात अव्वल ठरलेला पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याची अलीकडच्या काळातील काही उदाहरणं....    

मेघालय (२०१८)एकूण जागा - ६०काँग्रेस २१ जागा जिंकून ठरला सर्वात मोठा पक्ष. पण, १९ जागा जिंकणाऱ्या एनपीपीने भाजपा (२), यूडीपी (६) आणि तीन अन्य आमदारांना सोबत घेऊन स्थापन केलं सरकार.

मणिपूर (२०१७)एकूण जागा - ६०काँग्रेसनं सर्वाधिक २८ जागा जिंकल्या. 'मॅजिक फिगर'पासून ते फक्त तीन जागा दूर होते. पण, २१ जागा जिंकणाऱ्या भाजपानं त्यांना धक्का दिला. एनपीपी, एनपीएफ आणि एलजेपी यांच्याशी हातमिळवणी करत त्यांनी सरकार स्थापन केलं. 

गोवा (२०१७)एकूण जागा  - ४० काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. भाजपाला १३ जागांपर्यंतच मजल मारता आली होती. पण अमित शहांनी एका रात्रीत सगळं गणितच बदलून टाकलं. मगोप, अन्य आणि तीन अपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपाने गोव्यातील सत्ता कायम राखली होती.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८