शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

'हे' आहेत कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत आमदार, संपत्ती पाहून डोळे गरगरतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 12:15 IST

कर्नाटक विधानसभेतील २२१ पैकी २१५, म्हणजेच ९७ टक्के आमदार कोट्यधीश आहेत.

बेंगळुरूः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आणि काँग्रेस-जेडीएसनं हातमिळवणी करून भाजपाची कोंडी केल्यानं सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात बरीच आर्थिक गणितं मांडली जात असताना, कर्नाटकमधील आमदारांच्या संपत्तीचा आकडा समोर आलाय आणि तो डोकं गरगरून टाकणारा आहे.  कर्नाटक विधानसभेतील २२१ पैकी २१५, म्हणजेच ९७ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. १५ आमदारांकडे १०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यात एक भाजपाचा, ३ जेडीएसचे आणि ११ काँग्रेसचे आमदार आहेत. सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिले तीनही क्रमांक काँग्रेस आमदारांनी पटकावलेत. एम नागराजू यांच्याकडे तब्बल १०१५ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या खालोखाल ८४० कोटींचे धनी असलेल्या डी के शिवकुमार यांचा नंबर लागतो. तिसऱ्या स्थानावर सुरेश बी. एस. असून त्यांच्याकडे ४१६ कोटींची संपत्ती आहे.

२०१३ मध्ये कर्नाटक विधानसभेतील ९३ टक्के आमदार करोडपती होते. २१८ आमदारांकडे सरासरी २३.५४ कोटी इतकी मालमत्ता होती, तर २०१८ मध्ये एकूण २२१ आमदारांकडे सरासरी ३४.५४ कोटी इतकी संपत्ती असल्याचं एडीआरने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यांनी उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. 

कर्नाटक विधानसभेतील सर्वात 'गरीब' आमदार भाजपाचा आहे. मैसूरमधील एस ए रामदास यांची संपत्ती ४० लाखांच्या आसपास आहे, तर जेडीएसचे ए एस रवींद्र यांच्याकडे ६८ लाखांची मालमत्ता आहे. बहुजन समाज पार्टीचे एकमेव आमदार एन महेश यांची संपत्ती ७५ लाखाहून थोडी अधिक आहे.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८