शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

मोदी चीन दौऱ्यात डोकलामबद्दल चकार शब्दही काढणार नाहीत- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 18:09 IST

राहुल गांधी यांची मोदींवर जळजळीत टीका

कर्नाटक: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यावर टीका केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या राहुल यांनी मोदींवर तिरकस शब्दांमध्ये निशाणा साधला. 'मोदी चीनच्या अध्यक्षांची अनौपचारिक भेट आहेत. या भेटीत त्यांनी डोकलाम आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडर या दोन मुद्यांवर नक्की चर्चा करावी. यासाठी मी मोदींना पाठिंबा देईन,' असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. यासाठी मोदी काल रात्री उशिरा चीनमध्ये दाखल झाले. मोदी आज दिवसभरात सहावेळा जिनपिंग यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमधील या भेटीगाठी अनौपचारिक स्वरुपाच्या असतील. या भेटींना सुरुवातदेखील झालीय. मोदींच्या या 'अनौपचारिक' दौऱ्यावर राहुल गांधी यांनी तिरकसपणे टीका केलीय. 'मी तुम्हाला लिहून देतो, चीन दौऱ्यात मोदी डोकलामच्या मुद्यावर तोंडातून एक शब्दही काढणार नाहीत,' असं राहुल यांनी म्हटलं. राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी जनसभेला संबोधित केलं. 'देशात दररोज बलात्काराच्या घटना समोर येत आहेत आणि मोदी चीनच्या अध्यक्षांसोबत झोपळ्यावर जाऊन बसले आहेत. चीनमध्ये मोदी डोकलामविषयी चकार शब्द काढणार नाहीत, हे तुम्ही लिहून घ्या. हीच आहे मोदींची 56 इंचांची छाती. खोटे शब्द आणि खोटी आश्वासनं,' अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन