शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Opinion Poll: कर्नाटकातील बहुमतापासून काँग्रेस दूर, भाजपालाही सत्तासुंदरीची हूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 11:39 IST

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींनीही जोर धरला आहे. देशातल्या 20 राज्यांत सत्तेत असलेल्या एनडीएला कर्नाटकातही मोठं यश मिळण्याची चिन्हे आहेत.

बंगळुरु : कर्नाटकात विधानसभा 2018च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींनीही जोर धरला आहे. देशातल्या 20 राज्यांत सत्तेत असलेल्या एनडीएला कर्नाटकातही मोठं यश मिळण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकात सर्वच राजकीय पक्ष स्वतःच्या विजयाचे दावे करत आहेत. परंतु यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडेच सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय.भारतीय राजकारणाची दिशा ठरवणा-या या निवडणुकीचा कल जैन- लोकनीती- सीएसडीएस यांनी जाणून घेतला. जैन-लोकनीती-सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला 89 ते 95 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसलाही 85 ते 91  जागा मिळण्याची शक्यता आहे. देवेगौडांच्या जनता दल सेक्युलर या पक्षालाही 32 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 6 ते 12 जागा मिळू शकतात. लिंगायत समाजाला चुचकारण्यासाठी काँग्रेसनं गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना स्वतंत्र धर्माचा दर्जाही देऊ केला होता.तरीही लिंगायत समाज हा भाजपासोबत असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांना 30 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर भाजपाच्या येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदासाठी 25 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. देवेगौडांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांना 20 टक्के जनतेनं पसंती दिली. कर्नाटकातील एकूण 224 जागांपैकी बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसच्या हातून कर्नाटकाची सत्ता जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे जेडीएसशिवाय भाजपा सत्ता स्थापन करू शकत नसल्याचाही अंदाज वर्तवला जातोय.    

  • टाइम्स नाऊ आणि व्हीएमआर ओपिनियन पोल

- काँग्रेस- 91- भाजपा- 89- जेडीएस- 40

  • इंडिया टुडे आणि कार्वे ओपिनियन पोल

- काँग्रेस- 90-91- भाजपा- 76-86- जेडीएस- 34-43

  • सी-फोरचा ओपिनियन पोल

- काँग्रेस- 126- भाजपा- 70- जेडीएस- 27

  • टीव्ही 9- सी व्होटर

- काँग्रेस- 102- भाजपा- 96- जेडीएस- 25 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)Narendra Modiनरेंद्र मोदी