शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळातील 32 पैकी 24 मंत्र्यांवर गुन्हे; 31 कोट्यधीश! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:30 IST

Karnataka ADR Report : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती समोर आली आहे.

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून खात्यांची विभागणीही केली आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात एकूण 32 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही गुन्हेगारी प्रकरणांपासून मुक्त नाहीत. 32 मंत्र्यांपैकी 24 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, 32 मंत्र्यांपैकी 31 कोट्यधीश आहेत, ज्यांची सरासरी संपत्ती जवळपास 119.06 कोटी रुपये आहे. सिद्धरामय्या यांनी आपली संपत्ती 51 कोटी रुपये असल्याचे घोषित केले आहे, तर त्यांच्यावर 23 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहेत. या मंत्र्यांमध्ये सर्वात श्रीमंत उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आहेत, ज्यांनी 1,413.80 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तसेच, या मंत्र्यांमध्ये सर्वात कमी संपत्ती तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा यांच्याकडे आहे, त्यांची संपत्ती फक्त 58.56 लाख रुपये आहे.

याचबरोबर, मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या एकमेव महिला आमदार लक्ष्मी आर हेब्बाळकर याही करोडपती आहेत. त्यांच्याकडे 13 कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्यांनी 5 कोटींहून अधिक कर्जाची घोषणा केली आहे. कर्जाच्या बाबतीत डीके शिवकुमार पहिल्या क्रमांकावर आहेत. कनकापुरा मतदारसंघातून विजयी झालेल्या शिवकुमार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 265 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे म्हटले आहे.

8वी ते 12वी पर्यंतचे 6 मंत्र्यांचे शिक्षणमंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये 6 असे मंत्री आहेत, ज्यांनी 8वी ते 12वी पर्यंतची शैक्षणिक पात्रता जाहीर केली आहे तर 24 मंत्री एकतर पदवीधर किंवा उच्च शैक्षणिक पात्रता असलेले आहेत. दोन मंत्री पदविकाधारक आहेत. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या एकूण मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांचे वय 41 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे. 14 मंत्र्यांचे वय 60 ते 80 दरम्यान आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार व इतर आठ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर शनिवारी आणखी 24 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटक