शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections 2018 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 09:31 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेद्वारे राज्यात होणा-या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी काँग्रेस आणि  भाजपामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार कर्नाटकचे दौरे करत आहेत तर भाजपानंही सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.

कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपुष्टात येत आहे. 225 सदस्यांच्या विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. दरम्यान, निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावून रिंगणात उतरले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे. 

तर दुसरीकडे, बी.एस. येडियुरप्पांना यांना मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा बनवून भाजपानं प्रचाराच्या मैदानात उडी घेतली आहे. तर जेडीएस व बसपा आघाडी करुन निवडणूक लढवणार आहेत.  

कर्नाटकात जनता दलाचे सात आमदार काँग्रेसमध्ये जाणार!दरम्यान, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, जनता दल सेक्युलरचे सात बंडखोर आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय याच पक्षाचे विधान परिषदेचे तीन माजी आमदारही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. जनता दल सेक्युलरच्या या सात आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

या सात आमदारांनी २०१६ मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार के. सी. राममूर्ती यांना मतदान केले होते. जनता दल सेक्युलरचा व्हिप डावलून क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी हे सात आमदार कायदेशीर कारवाईला तोंड देत आहेत. या आमदारांनी शुक्रवारी पुन्हा एकदा काँग्रेसचे खासदार जी. सी. चंद्रशेखर यांना मतदान केले. त्यामुळे जनता दल सेक्युलरचे उमेदवार बी. एम. फारुक यांचा पराभव झाला.या सात आमदारांवर २३ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वीच अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी जनता दलाने विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.

मात्र, त्यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. या आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष कोलिवाड म्हणाले की, या आमदारांच्या अपात्रतेबाबतचे प्रकरण माझ्याकडे प्रलंबित आहे आणि यावर निर्णय देण्यापूर्वी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Electionनिवडणूक