शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Election 2018- ...तर मी काँग्रेसला पाठिंबा देईन- एच. डी. देवेगौडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 09:40 IST

कर्नाटकात विधानसभा 2019च्या निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे.

बंगळुरू- कर्नाटकात विधानसभा 2018च्या निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे.  सत्ताधारी काँग्रेसनं सभांचा धडाका लावलेला असून, राहुल गांधी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून अमित शाहा प्रचारात सक्रिय झालेत. परंतु या विधानसभेचा कौल त्रिशंकू येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर एच. डी. देवेगौडा यांनी पाठिंब्याबाबत सूचक विधान केलं आहे.कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास आम्ही काँग्रेससोबत जाऊ, असंही देवेगौडा म्हणाले आहेत. तसेच त्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. कर्नाटकाला भाजपाच्या सत्ताकाळात प्रचंड अडचणींना सामना करावा लागला. 5 वर्षांत भाजपानं तीन मुख्यमंत्री  बदलले. हे कर्नाटकासाठी भाजपाचं योगदान आहे. परंतु पाच वर्षांत काँग्रेसनं एकच मुख्यमंत्री ठेवला. त्यांनी सरकारी नोकरदारांसाठी काय केलं पाहा. मी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्यानं माझ्यावर टीकाही करण्यात आली.मी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर काँग्रेसला पाठिंबा दिला. भाजपाही पाठिंब्यासाठी माझ्या दारी आली होती. परंतु मी त्यांना नाही सांगितलं. काँग्रेसला पाठिंबा देऊनही आमची भूमिका काय ?, राजकारणातल्या पहिल्या दिवसापासून मी धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनं उभा राहिलो असून, कधीही भावनिक राजकारण केलं नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हा डीजी रामालिंगम यांना विचारणा केली होती की, पोलीस विभागात मुस्लिम हवालदार किती आहेत, तेव्हा त्यांनी फक्त 0.01 टक्के, असं उत्तर दिलं. माणुसकीमुळेच मला आरक्षण मिळालं आहे, असंही देवेगौडा म्हणाले आहेत.जुन्या म्हैसूर भागात जनता दला(एस)चा मोठा प्रभाव आहे. काँग्रेस आणि जनता दल(सेक्युलर)मध्ये जवळपास 75 विधानसभांच्या जागांवर सरळ सरळ लढत आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. म्हैसूर, हसन, मंड्या, टुमकूर आणि बंगळुरूतल्या बाहेरच्या भागातही कुमारस्वामी यांनी मोठ्या प्रमाणात रॅली घेतल्या आहेत. त्यामुळे कुमारस्वामी पुन्हा सत्ता मिळवतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Janata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)