कळमेश्वर... जोड
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
यासंदर्भात नागरिकांनी पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र पालटकर यांच्याशी संपर्क साधला. सदर रस्त्याच्या डांबरीकरण व खडीकरणात होत असलेला भ्रष्टाचार त्यांच्या लक्षात आणून दिला. या गंभीर प्रकाराची दखल घेत उपसभापतींनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंगळे, कृउबासचे उपसभापती गुणवंत नागपुरे आदींसह रस्त्याच्या कामाची पाहणी केली. दरम्यान, त्यांना नागरिकांच्या तक्रारीत तथ्य दिसून आले. डांबरीकरणासाठी टाकण्यात आलेली गिी बाजूला सारण्यात आल्यानंतर त्याखाली डांबरच टाकले नसल्याचे निदर्शनात आले. रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर अत्यल्प असल्याने डांबरीकरणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका वार्ताहर)
कळमेश्वर... जोड
यासंदर्भात नागरिकांनी पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र पालटकर यांच्याशी संपर्क साधला. सदर रस्त्याच्या डांबरीकरण व खडीकरणात होत असलेला भ्रष्टाचार त्यांच्या लक्षात आणून दिला. या गंभीर प्रकाराची दखल घेत उपसभापतींनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंगळे, कृउबासचे उपसभापती गुणवंत नागपुरे आदींसह रस्त्याच्या कामाची पाहणी केली. दरम्यान, त्यांना नागरिकांच्या तक्रारीत तथ्य दिसून आले. डांबरीकरणासाठी टाकण्यात आलेली गिट्टी बाजूला सारण्यात आल्यानंतर त्याखाली डांबरच टाकले नसल्याचे निदर्शनात आले. रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर अत्यल्प असल्याने डांबरीकरणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका वार्ताहर).......मासिक सभेत गाजला डांबरीकरणाचा विषयपंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेत सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचा विषय चांगलाच गाजला. निकृष्ट डांबरीकरणाबाबत अभियंता आसनवार यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पालटकर यांनी मंजूर कामाची इस्टिमेट कॉपी तत्काळ उपलब्ध करून द्यावी व नियमाप्रमाणे काम करावे, असे निर्देश दिले. या रस्त्याच्या कामाचे इस्टिमेट प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कामाबाबत तक्रार करण्यात येईल व चौकशी करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उपसभापती पालटकर म्हणाले. डांबरीकरणाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी हजर असताना रस्त्यावर डांबर न टाकता गिट्टी अंथरण्याचे काम सुरू असल्याने हे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची नेमणूक कशासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.