शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan: कारगिल युद्ध ते एअर स्ट्राईक; धनोआ यांची दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 12:01 IST

जेव्हा अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशी भावना दोन वर्षांपूर्वी कारगिल विजय दिवासानिमित्त दिलेल्या मुलाखतीत बी. एस. धनोआ यांनी व्यक्त केली होती.

ठळक मुद्देपुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला दणका दिला आहे.  'मिराज2000' च्या 12 विमानांनी जैश ए मोहम्मदचं अल्फा-3 नियंत्रण कक्ष आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.कारगिल युद्धावेळी विंग कमांडर असलेल्या धनोआ यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हाती.

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला दणका दिला आहे. आज मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान 'मिराज2000' विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. 'मिराज2000' च्या 12 विमानांनी जैश ए मोहम्मदचं अल्फा-3 नियंत्रण कक्ष आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे पाकिस्तानला कारगिल युद्धात धडा शिकवणाऱ्या बी. एस. धनोआ यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करणं धाडसाचं मानलं जातं. मात्र हवाई दलाचे प्रमुख असलेल्या धनोआ यांना अशा कारवाईचा अनुभव आहे. कारगिल युद्धावेळी विंग कमांडर असलेल्या धनोआ यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हाती. त्यावेळी त्यांनी लढाऊ विमानांच्या तुकडीचं यशस्वी नेतृत्व केलं होतं. जेव्हा अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशी भावना दोन वर्षांपूर्वी कारगिल विजय दिवासानिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केली होती.

पाकिस्तानकडे एफ-16 ही अत्याधुनिक विमानं असताना, त्यांच्याकडून प्रतिहल्ला होण्याची दाट शक्यता असतानाही भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरने धडाकेबाज कारवाई केली. रात्रीच्या वेळी अशा कारवाया करणं आव्हानात्मक असतं. मात्र तरीही हवाई दलाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली.

भारताची 'मिराज2000' विमानं बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमध्ये कारवाई करत असताना पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर येत आहे. मात्र या विमानांनी उड्डाण करण्याआधीच भारतीय हवाई दलाने कारवाई पूर्ण केली. कारगिलवेळी केलेल्या कारवाईचा अनुभव यावेळी धनोआ यांना कामी आला. 'जेव्हा तुम्हाला कारवाईची संधी मिळते, तेव्हा तुम्ही पूर्णपणे सज्ज असावं लागतं. तुम्ही आयुष्यभर या संधीची वाट पाहत असता. ज्यावेळी अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा तो स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो,' असं धनोआ यांनी कारगिलच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं होतं.

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला