शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लस देण्यास वैद्यकीय पथकासोबत तहसीलदार गावात पोहोचले अन् गावकरी पळाले; मग कसं झालं लसीकरण? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 12:03 IST

कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला.

कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला. गावात तहसीलदार वैद्यकीय पथकासोबत लसीकरणासाठी पोहोचले. पण वैद्यकीय पथकाला पाहून गावकऱ्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली तर काहींनी घराचे दरवाजेच लावून घेतले. काही गावकऱ्यांनी तर लस घेणं टाळण्यासाठी थेट शेतात पळ काढला. 

गावात एकच शांतता पसरली होती. तहसीलदारांच्या नेतृत्त्वाबाबत आरोग्य विभागाच्या पथकानं जेव्हा लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला. कुणीच लस घेण्यसाठी पुढे यायला तयार नव्हतं. अशावेळी तहसीलदारांना चक्क पोलिसांना पाचारण करावं लागलं. त्यानंतर गावातील मौलवींनी गावातील मशिदीवरुन उदघोषकाच्या सहाय्यानं लोकांना जागरुक करण्याचं काम केलं. त्यानंतर लोक लस टोचून घेण्यास पुढे येऊ लागले. 

गावात १२० लोकांचं लसीकरणपोलीस आणि मौलवींनी पुढाकार घेऊन लोकांना जागरुक केल्यानंतर आरोग्य विभागानं गावातील १२० लोकांना कोरोना विरोधी लसीचा डोस दिला. लसीबाबतची अफवा गावात पसरली होती. त्यामुळे कोणताही गावकरी लस घेण्यास पुढे येत नव्हता. रविवारी अहेर गावात लोकांमध्ये जनजागृतीसाठी तहसीलदार अनिक कुमार सरोज आरोग्य विभागाचे काही सदस्य पोहोचले. तहसीलदारांना पाहून गावकऱ्या थेट घरात पळाले आणि दरवाजे बंद करुन घेतले होते. तर काहीजण शेतात पळून गेले होते. 

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्याचं दरवाजे ठोठावले आणि लस घेण्यासाठी आग्रह केला. पण एकानाही इच्छा व्यक्त केली नाही. तहसीलदारांना पोलीस बोलवावे लागले. पण पोलिसांना पाचारण करुनही काम झालं नाही. गावकऱ्यांचा विरोध पाहता तहसीलदारांनी मशिदीत जाऊन मौलवींशी बातचित केली आणि त्यांना मशिदीवरील भोंग्यावरुन जनजागृती करण्याचं आवाहन केलं. 

कोरोना विरोधी लस घेतल्यानं कोरोना विषाणूचा धोका कसा कमी होतो. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सारं महत्त्व मौलवींनी गावकऱ्यांना पटवून दिलं. त्यानंतर लोक लस घेण्यास तयार झाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या