शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"मोदीजी तुम्ही खूप महागाई केलीय, पेन्सिल-रबरही महाग केलं"; चिमुकलीचं पंतप्रधानांना भावूक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 12:28 IST

PM Narendra Modi : इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना महागाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

नवी दिल्ली - महागाईमुळे सर्वसांमान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढल्याने लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. असं असतानाच आता  इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) महागाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत एक भावनिक पत्र लिहिलं आहे. सोशल मीडियावर सध्या या पत्राची तुफान चर्चा रंगली आहे. "मोदीजी तुम्ही खूप महागाई केलीय, पेन्सिल-रबरही महाग केलं" असं म्हणत तिने 'मन की बात' सांगितली आहे. 

कृती दुबे असं या सहा वर्षांच्या मुलीचं नाव असून ती उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यातील छिहरामऊ परिसरात राहते. तिने मोदींना लिहिलेल्या पत्रात "पंतप्रधान जी, माझे नाव कृती दुबे आहे. मी इयत्ता पहिलीत शिकते. मोदीजी तुम्ही खूप महागाई केली आहे. पेन्सिल आणि रबरही महाग केले आहे. आणि मॅगीच्या किंमतीही वाढल्या आहेत. आता पेन्सिल मागितली म्हणून आई मला मारते. मी काय करू? मुलं माझी पेन्सिल चोरतात" असं म्हटलं आहे. 

कृतीने हिंदीत लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मुलीचे वडील विशाल दुबे हे वकील आहेत. त्यांनी "ही माझ्या मुलीची 'मन की बात' आहे. नुकतंच तिच्या आईने शाळेत पेन्सिल हरवल्याबद्दल तिला मारले तेव्हा तिला राग आला" असं म्हटलं आहे.  अशोक कुमार यांनी सांगितले की, या चिमुकलीच्या पत्राबद्दल त्यांना सोशल मीडियावरून कळले. "मी मुलीला शक्य ती मदत करण्यास तयार आहे आणि तिचे पत्र संबंधित अधिकार्‍यांपर्यंत पोहोचावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन" असे ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई