शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कान्हा नॅशनल पार्क झाला नक्षल छावणी, वन्यजीव व पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता; कर्मचाऱ्यांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 07:03 IST

Kanha National Park News: मध्य प्रदेशमधील ख्यातनाम कान्हा नॅशनल पार्कचे रूपांतर जवळपास नक्षल छावणीत झाले असून, वन्यजीव व पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कान्हा नॅशनल पार्कचा विस्तार छत्तीसगडच्या सीमेवरील दोन आदिवासी जिल्ह्यांत झाला आहे.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : मध्य प्रदेशमधील ख्यातनाम कान्हा नॅशनल पार्कचे रूपांतर जवळपास नक्षल छावणीत झाले असून, वन्यजीव व पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कान्हा नॅशनल पार्कचा विस्तार छत्तीसगडच्या सीमेवरील दोन आदिवासी जिल्ह्यांत झाला आहे.

काही वर्षांपासून नक्षली नॅशनल पार्कच्या अंतर्गत जंगलात सक्रिय आहेतच, आता त्यांनी वाघांसाठी सुरक्षित स्थळ असलेल्या भागातही शिरकाव केला आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले. “येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून, गेल्या दशकांत छत्तीसगडची दोन व्याघ्र अभयारण्ये जशी गमावली, ती अवस्था कान्हाची होते की काय, अशी भीती मला वाटते,” असे पार्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी छत्तीसगडमधील नक्षलींच्या उपद्रवाचा उल्लेख करून म्हटले. छत्तीसगडमध्ये उदांती आणि इंद्रावती व्याघ्र अभयारण्यांचा ताबा फार पूर्वीच नक्षलींच्या वेगवेगळ्या दलमनी घेतला असून, ते वाघांची मोजणी थांबवितात.

कान्हातील व्याघ्र राखीव क्षेत्राचा जवळपास ८० टक्के भाग हा नक्षलींच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली असून, त्यांनी छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी दडपण वाढविल्यावर आपल्या कारवाया विस्तारल्या आहेत. मोचा आणि खाटिया दलमची स्थानिक पातळीवर शक्ती वाढली असून, वनविभागाचे कनिष्ठ पातळीवरील कर्मचारी कर्तव्य बजावण्यास फार घाबरतात. 

परिस्थिती हाताबाहेर जाईलमाजी मुख्य वन्यजीव वॉर्डन एच.एस. पाबला ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, “केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकारच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या स्फाेटक परिस्थितीवर विचार व्हायला हवा होता. पर्यटकाचे अपहरण झाले किंवा त्याची हत्या केली गेली, तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाईल.”

टॅग्स :naxaliteनक्षलवादीMadhya Pradeshमध्य प्रदेश