शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

कंधार शहरी व ग्रामीण नागरिक तापीने बेजार

By admin | Updated: May 6, 2014 20:57 IST

कंधार : शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना ताप आजाराने भलतेच बेजार केले आहे़ शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्रातही रूग्ण उपचार घेतानाचे चित्र समोर आले आहे़

कंधार : शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना ताप आजाराने भलतेच बेजार केले आहे़ शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्रातही रूग्ण उपचार घेतानाचे चित्र समोर आले आहे़गत दीड ते दोन महिन्यापासून हवामान व वातावरणात सतत बदल होत आहे़ उष्णता, गारवा, गारपीट, पावसाची हजेरी आदींमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे़ त्यामुळे सर्दी-ताप-खोकला आदीला सामोरे जाण्याचा प्रसंग नागरिकांवर ओढवला आहे़ ग्रामीण रुग्णालयात बा‘ रुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण ४०० ते ५०० असतात़ त्यात गत काही दिवसांपासून तापीचे ३० ते ४० रुग्ण आहेत़ विशेष म्हणजे त्यातील ४ ते ५ जण टायफाईडचे असल्याचे सांगण्यात आले़ अंतररूग्ण विभागात दररोज १०-१५ रूग्ण दाखल होत आहेत़ रुग्णावर डॉ़संगीता भालेराव, डॉ़चंद्रकांत पाटील, डॉ़दत्तात्रय गुडमेवार, डॉ़बालाजी कागणे, डॉ़निकत फातेमा आदीजण उपचार करत आहेत़ शहरात होत असलेल्या मानार नदीतील पाणीपुरवठा दूषित आहे़ यापासून बचाव करण्यासाठी ऩप़ आता ध्वनीक्षेपाद्वारे पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन करत आहे़ ऩप़ लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागात आता तरी जावून नागरिकांना दिलासा देतील का, गटातटाचे राजकारण बाजूला सारून शहरवासियांचे प्रश्न सोडतील का हा खरा प्रश्न आहे़ ऩप़मध्ये विकासावर बोलणारे, समस्यांना वाचा फोडणारे नगरसेवक आहेत की नाहीत, अशी चर्चा नागरिक करीत आहेत़ एखाद्या प्रश्नाचा निपटारा होण्यासाठी ऩप़वर निघणारे मोर्चेही होत नाहीत़ नागरिकही उदासिन झाले आहेत़ स्वच्छतेबद्दल ऩप़ जशी तत्पर आहे, तसेच शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी असावी, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे़ रस्त्यावर उडणारा धुराळा उपहारगृहातील खाद्यपदार्थांवर जात आहे़ उघडे ठेवलेले अन्न व खाद्यपदार्थ सेवन करणे,दूषित पाणी पिणे आदीने नागरिक रोगाचा सामना करत आहेत़ शहरासोबतच ग्रामीण भागातही तापीचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे़१ ते ५ मे कालावधीत प्राथमिक आरोग्य कंेद्रात तापरूग्ण उपचारासाठ दाखल झाल्याची माहिती तालुका आरोग्यअधिकारी डॉ़ढवळे व अली यांनी दिली़ पानशेवडी प्रा़आ़केंद्रात-८, कुरूळा-५, उस्माननगर-१२, पेठवडज-२३ व बारूळ प्रा़आ़केंद्रात २५ रूग्ण वरील कालावधीत होते़ उपचारासाठी मुबलक औषधसाठा उपलब्ध असताना खाजगी रुग्णालयात दररोज १०० ते १५० रुग्ण कसे उपचार घेत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे़