कामोठेत महिलांचा अखंड हरिनाम सप्ताह
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
पनवेल : कामोठेत मानसरोवर सांस्कृतिक कला, क्रीडा संस्था यांच्यावतीने महिला दिन व शिवजयंतीचे औचित्य साधून दि. ८ ते १५ या कालावधीत महिलांचा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात विविध भागांतील महिला एकत्र येऊन आपली कला सादर करणार आहेत. त्यामध्ये टाळवादन, गायन, मृदंुग वादन, हरिपाठ पारायण यामध्ये महिला सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)