नवी दिल्ली : दाक्षिणात्य सिनेसृष्टी व बॉलीवूडमध्ये आपल्या गुणवत्तेचा वेगळा ठसा उमटविलेले अभिनेते कमल हसन यांना विषबाधा झाल्याने येथे मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कमल हसन यांना विषबाधा झाल्याने अपोलो रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना बुधवारी सुटी दिली जाईल, असेही या नोंदीत म्हटले आहे. कमल हसन सध्या तामिळ चित्रपट पप्नासमच्या रिमेकमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्या समवेत अभिनेत्री गौतमी आहेत. (वृत्तसंस्था)