शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कमल हासन राष्ट्रीय राजकारणामध्ये? ममता बॅनर्जींसह दोन मुख्यमंत्र्यांना भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 06:12 IST

आपण राजकारण प्रवेशाबाबत गंभीर असल्याचे संकेत दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्या हालचालींतून मिळत आहेत, तसेच ते राष्ट्रीय पातळीवर आपले नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संकेतही आहेत. शुक्रवारी कोलकाता दौ-यात त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यातून त्यांचे इरादे अधिक स्पष्ट झाले.

चेन्नई : आपण राजकारण प्रवेशाबाबत गंभीर असल्याचे संकेत दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्या हालचालींतून मिळत आहेत, तसेच ते राष्ट्रीय पातळीवर आपले नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संकेतही आहेत. शुक्रवारी कोलकाता दौ-यात त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यातून त्यांचे इरादे अधिक स्पष्ट झाले.कमल हासन हे २३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोलकात्याला गेले होते; हीच संधी साधून त्यांनी ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली. कमल हासन यांनी भेट घेतलेल्या त्या तिस-या बिगर-भाजपा आणि बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री आहेत. याआधी १ सप्टेंबर रोजी त्यांनी थिरुवनंतपुरमला जाऊन केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भोजनाचे निमंत्रण देऊन चेन्नईला बोलावून घेतले होते. नंतर दोघे एकत्रितरीत्या पत्रकारांनाही सामोरे गेले होते. भेटीचा उद्देश आणि अजेंडा याबाबत दोघांनीही मौन बाळगले होते. तिन्ही मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कमल हासन यांच्या राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)रंग भगवा नाहीविजयन आणि केजरीवाल यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कमल हासन यांनी घेतलेली ममता बॅनर्जी यांची भेट महत्त्वाची ठरते. विजयन यांच्या भेटीनंतर ‘आपला रंग भगवा नसल्या’चे वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. त्यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते एल. गणेशन यांनी कमल हासन यांचा रंग लाल असून, ते डाव्यांसोबत प्रवास करीत आहेत, असे म्हटले होते.

टॅग्स :Kamal Hassanकमल हासन