कळमेश्वर...
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली शाळा दत्तक
कळमेश्वर...
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली शाळा दत्तकसिंदी येथील शाळेत उपक्रम : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार?कळमेश्वर : देशात सुरू असलेल्या खासदारांच्या गाव दत्तक योजनेच्या धर्तीवर कळमेश्वरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शाळा दत्तक घेऊन शाळा विकासासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शाळा दत्तक या अभिनव उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खरोखरच फायदा होईल काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या तीन-चार कि.मी. अंतरावर असलेल्या सिंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गटशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी दत्तक घेतली आहे. या शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. परंतु या शाळेच्या गरजा या उपक्रमातून पूर्ण होऊन हा दत्तक शाळा उपक्रम यशस्वी होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अधिक लोकसंख्येच्या गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत पाच वर्गातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्या जाते. यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केल्या गेली असून, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी दोन वर्गखोल्या उपलब्ध आहेत. तसेच दोन्ही शिक्षकांपैकी एका शिक्षकाकडे वर्ग एक व वर्ग तीन तर दुसऱ्याकडे वर्ग दोन व वर्ग चारच्या अध्यापनाचे काम आहे. यात दोन-दोन वर्ग एकत्र बसवून त्यांना ज्ञानाचे धडे दिले जातात, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तासिकेनुसार कधी इयत्ता पहिली व तिसरी तर कधी दुसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसोबत बसवून दोन्ही शिक्षक नऊ तासिका घेतात.या शाळेतील एका शिक्षकाला तालुक्याच्या ठिकाणी विविध प्रशिक्षण, कार्यालयीन कामाकरिता जावे लागत असल्याने, पाचही वर्गांच्या अध्यापनाची जबाबदारी एकाच शिक्षकावर येते. अशा वेळी येथील विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा लागत असेल, हे स्पष्ट होते. शिवाय शाळेत स्वतंत्र कार्यालय नसून वर्गखोलीतच कार्यालयाचे कामकाज केल्या जाते. तसेच शाळेला विस्तीर्ण पटांगण नसल्याने येथे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. अतिरिक्त वर्गखोलीसुद्धा बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही.कोट...या उपक्रमासाठी शासकीय निधी नसून स्थानिक स्तरावर हे काम करावयाचे आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल.- प्रिया देशमुखगटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कळमेश्वर