शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

कल्याणचे करणार ‘कल्याण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:18 IST

देशातील रेल्वे स्थानके विमानतळांइतकी स्वच्छ, सुंदर व आकर्षक असावीत अशी रेल्वेची संकल्पना आहे. त्यासाठी प्रमुख स्थानकांच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम रेल्वेने हाती घेतला आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : देशातील रेल्वे स्थानके विमानतळांइतकी स्वच्छ, सुंदर व आकर्षक असावीत अशी रेल्वेची संकल्पना आहे. त्यासाठी प्रमुख स्थानकांच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम रेल्वेने हाती घेतला आहे.कल्याण रेल्वे स्थानकाचे कल्याण करण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व काम रेल्वे मंत्रालय जरूर करील. असे नि:संदिग्ध रेल्वे मंत्री सुरेश प्रभू कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नाला लोकसभेत उत्तर दिले.रेल्वे मंत्री म्हणाले की, मुंबई महानगरातील लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, ठाणे या स्थानकांबरोबर कल्याणचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. याखेरीज मुंबई उपनगरी रेल्वे वाहतुकीतील १८ स्थानकांचा विकास मुंबई रेल विकास निगम कडे सोपवण्यातआला आहे.खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की कल्याण स्थानकावरून रोज ३ लाख ६0 हजार तर डोंबिवली स्थानकावरून रोज ३ लाख रेल्वे लोक प्रवासाची सुरुवात करतात. या स्थानकांवरून दररोज ५00 दूर अंतराच्या ट्रेन्स व उपनगरी प्रवासी वाहतुकीच्या अनेक लोकल ट्रेन्स धावतात. रोज अडीच लाख तिकिटांची विक्री कल्याण स्थानकावर होते. मध्य रेल्वेच्या स्थानकांमधे गर्दी व तिकिट विक्रीत गेली ३ वर्षे कल्याण स्थानक प्रथम क्रमांकावर आहे. पुनर्विकास कार्यक्रमात रेल्वे स्थानकांची निवड करताना त्यात कल्याण डोंबिवलीचा समावेश का नाही? कल्याण स्थानकाच्या पुनर्विकासासाठी किती अवधी लागेल? स्वच्छ स्थानक योजनेत मुंबईच्या एकाही उपनगरी स्थानकाचा समावेश का नाही?खासदार सुप्रिया सुळे मूळ प्रश्नाला पूरक प्रश्न विचारताना म्हणाल्या की,आदर्श स्थानक योजना रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेशी संलग्न करण्यात आली आहे काय? महाराष्ट्रात हे काम फारच संथ गतीने चालले आहे. राज्यातल्या धार्मिक स्थळांमधे रेल्वेने आदर्श स्थानके बनवण्यासाठी शेगाव व शिर्डी स्थानकांना चांगल्या प्रकारे जोडले आहे. जेजुरीत खंडेराव महाराजांचे धार्मिक स्थानही महत्वाचे आहे. स्थानक पुनर्विकास योजनेत जेजुरीच्या रेल्वे स्थानकाचाही समावेश व्हावा. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, रेल्वे तिकिटांची दलाली करणाºयांना तसेच रेल्वे स्थानकांवर विविध वस्तूंच्या बेकायदेशीर विक्रे ते त्यांना पायबंद घालण्यासाठी बरेच कायदे आहेत. मात्र छोट्या शहरांमधे आजही या समस्येचे निराकरण झालेले नाही. उपरोक्त दोन्ही प्रश्नांची उत्तरे देतांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, तमाम रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हे रेल्वेचे अंतिम लक्ष्य आहे. जोपर्यंत हे काम होईपर्यंत अधिकाधिक सुविधांसह स्थानकांचे सौंदर्यीकरण यावर रेल्वेने भर दिला आहे. जेजुरी स्थानकाबाबतही रेल्वे मंत्रालय जरूर विचार करील. रेल्वे रिझर्वेशन प्रणालीत सुधारणा व परिवर्तन घडवण्यासाठी रेल्वेने अलीकडेच एक अ‍ॅप सुरू केले आहे. केवळ स्मार्ट फोनवरच नव्हे तर साध्या मोबाइलवरूनही तिकिटाचे बुकिंग कसे करता येईल, या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री म्हणाले, कॅटरिंगसंबंधी रेल्वेने नवे धोरण लागू केले आहे. या कामात स्थानिकांना रोजगार मिळावा हा हेतू आहे. त्यात महिला बचत गटांना प्राधान्य देण्याची आमची तयारी आहे. सावंतवाडीत हा प्रयोग आम्ही प्रायोगिक तत्वावर यशस्वीरित्या राबवला आहे.