शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 08:56 IST

केरळची राजधानी तिरुवानंतपुरम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

केरळ, दि.30 - केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. राजेश असे या कार्यकर्त्याचे नाव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घरी जाताना त्याच्यावर येथील श्रीकार्यम परिसरात  शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने राजेशवर हल्ला केला. या घटनेनंतर त्याला रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 20 वेळा चाकूने वार केले आहेत. तसेच, हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांच्या शोध सुरु आहे. दरम्यान, राजेशच्या हत्येमागे सीपीआय-एमचा हात असल्याचा आरोप केरळचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कुमानाम राजशेखरन यांनी केला आहे. याचबरोबर या हत्येचा निषेध म्हणून राज्यभर आज हरताळ पुकारला आहे. तर, सीपीआय-एमने कुमानम राजशेखरन यांनी केलेला आरोप फेटावून लावला आहे. शहर पोलीस आयुक्त स्परजंन कुमार यांना सांगितले की, हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शहरात पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.