शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात मोठा राजकीय भूकंप; के. कवितांची पक्षातून हकालपट्टी, वडिलांनीच केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:04 IST

के कविता यांना मंगळवारी भारत राष्ट्र समिती पक्षामधून निलंबित करण्यात आलं.

K. Kavitha Suspended: तेलंगणामधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या आणि आमदार के कविता यांना मंगळवारी भारत राष्ट्र समिती पक्षामधून निलंबित करण्यात आले. पक्षाची बदनामी करणाऱ्या कारवायांमुळे के. कविता यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी के. कविता यांना तात्काळ पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलंगणातील मुख्य विरोधी पक्ष भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबात खूप गोंधळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी कविता यांच्यावर मोठी कारवाई केली. पक्षाविरुद्धच्या वक्तव्यांमुळे आणि कारवायांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच के. कविता यांनी बीआरएस नेत्यांवर केसीआर यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केला होता.

त्यानंतर आता के. कविता यांचे सध्याचे वर्तन आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाया पक्षाची प्रतिमा मलिन करत आहेत, त्यामुळे पक्षाध्यक्ष केसीआर यांनी कविताला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीआरएस यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे २२ ऑगस्ट रोजीही कविता यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान बीआरएसने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी त्यांना अचानक टीबीजीकेएस म्हणजेच तेलंगणा बोग्गु गनी कर्मिका संगमच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी पक्षाच्या नेत्यांवर त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पदावरून काढून टाकणे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित पाऊल होते असं के. कविता यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, के कविता यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांच्यावर गंभीर आरोप केले. केटीआर त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी करत होते, असा आरोप के कविता यांनी केला.  केटीआर हे पक्षाचे संस्थापक के चंद्रशेखर राव यांचे सख्खे भाऊ आहेत. "माझ्या माहितीशिवाय पक्ष कार्यालयात निवडणुका घेण्यात आल्या, ज्यामुळे कामगार कायद्यांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. पक्षात काम कसे चालले आहे यावर मी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यामुळे माझ्याविरुद्ध द्वेष होता," असेही के. कविता यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Telanganaतेलंगणा