शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

केंद्र सरकारमधील प्रमुख पक्षाच्या नेत्याने विरोधकांसह घेतली पॅलेस्टाइनच्या नेत्याची भेट, इस्राइलला सुनावले खडेबोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 09:46 IST

Indian Opposition Leaders Meet Palestinian Leader: भारतातील विरोधी पक्षांच्या एका गटाने नुकतीच पॅलेस्टाइनच्या एका नेत्याची भेट घेतली. या भेटीदरम्यान, केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील भाजपाच्या एका मित्रपक्षानेही उपस्थिती दर्शवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

मध्य पूर्ण आशियामध्ये इस्राइल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये मागच्या १० महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या संघर्षामध्ये पॅलेस्टाइनमधील गाझा शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. इस्राइल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इस्राइलविरोधात भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, भारतातील विरोधी पक्षांच्या एका गटाने नुकतीच पॅलेस्टाइनच्या एका नेत्याची भेट घेतली. तसेच पॅलेस्टाइनी नागरिकांच्या सुरू असलेल्या नरसंहाराचा निषेध केला. तसेच भारत सरकराने इस्राइलला हत्यारे आणि दारुगोळ्याचा पुरवठा रोखावा, अशी मागणी केली. या भेटीदरम्यान, केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील भाजपाच्या एका मित्रपक्षानेही उपस्थिती दर्शवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

दिल्लीमध्ये पॅलेस्टाइनी नेते मोहम्मद मकरम बलावी यांची भारतातील विरोधी पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यामध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप या पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. या नेत्यांबरोबरच केंद्रातील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे नेते के. सी. त्यागी यांनीही या शिष्टमंडळासोबत पॅलेस्टाइनच्या नेत्याची भेट घेतली. या भेटीदरम्यान, पॅलेस्टाइनचे नेते मकरम बलावी यांनी इस्राइलकडून होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाबाबत सविस्तर चर्चा केली. के. सी. त्यागी यांनी पॅलेस्टाइनी नेत्याची भेट घेतल्याने आता इस्राइल आणि पॅलेस्टाइन यांच्यामधील संघर्षादरम्यान, जेडीयूची भूमिका ही केंद्र सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

यावेळी विरोधी पक्षांच्य शिष्टमंडळाने एका पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात पॅलेस्टाइनी नागरिकांच्या सुरू असलेल्या नरसंहाराचा निषेध करण्यात आला. तसेच महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा हवाला देत १९८८ मध्ये पॅलेस्टाइनला मान्यता देणारा भारत हा पहिला बिगर अरब देश असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही सांगितले.   

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीJanta Dal Unitedजनता दल युनायटेडIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध