शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"मी स्वप्नातही विचार केला नव्हता..."; शिवराज सरकारचे मंत्री ढसाढसा रडले, केला साष्टांग नमस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 13:02 IST

मध्य प्रदेशच्या निवडणुकीत काही उमेदवार मंचावर रडत आहेत, तर काही जण नमस्कार करत आहेत.

मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचाराजोरात सुरू आहे. मत मागण्याच्या नवनवीन शैली पाहायला मिळत आहेत. नेत्यांनी हात जोडून मत मागणं सर्रास घडलं आहे, पण मध्य प्रदेशच्या निवडणुकीत काही उमेदवार मंचावर रडत आहेत, तर काही जण नमस्कार करत आहेत. शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिंधिया समर्थक आमदार आणि शिवराज सरकारमधील पीडब्ल्यूडी राज्यमंत्री, सुरेश राठखेडा मंचावरूनच रडू लागले. 

जनतेला मतदान करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, महाराज सिंधिया आणि मामा शिवराज यांनी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला बल्लभ भवनात पाठवतील याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मंचावरून रडत रडत राठखेडा यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आणि म्हणाले, "मी तुम्हाला विनंती करतो, कृपया माझी लाज राखा." त्यांनी मंचावरूनच लोकांसमोर साष्टांग नमस्कारही घातला. 

दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधियाही त्यांच्या समर्थकांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुना ते अशोकनगरपर्यंत निवडणूक रॅली काढल्या आणि त्यांच्या समर्थक नेत्यांसाठी मते मागितली. काही ठिकाणी सिंधिया यांनी भाजपाच्या नावाने नव्हे तर पंतप्रधान मोदींच्या नावाने मतदान करण्याचे आवाहन केले. 

गुना जिल्ह्यातील बामोरी मतदारसंघातील उमेदवार महेंद्र सिंह सिसोदिया यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना सिंधिया यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला. सिंधिया म्हणाले की, मी तुम्हाला भावनिक आवाहन करत आहे, माझ्या मनापासून विनंती करतो, माझे हात बळकट करा आणि तुमच्या मुलाला महेंद्रला विजयी करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३