शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळ गाठण्यापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदेंना विरोध; अज्ञात लोकांनी पोस्टर फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 11:46 IST

शिंदे हे आज दुपारी तीनच्या सुमारास भोपाळला पोहचतील, येथून त्यांचा ताफा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पोहोचेल.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. तर शिंदे यांचा भोपाळमध्ये आज जोरदार स्वागत केले जाणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ठीक-ठिकाणी होर्डींग लावण्यात आले आहे. मात्र याच होर्डींगवर अज्ञात लोकांकडून शाई फेक करण्यात आली असून, लावण्यात आलेले पोस्टर सुद्धा फाडण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापासून मध्य प्रदेशात सुरू असलेला सत्तासंघर्षला बुधवारी पूर्णविराम मिळालं. तसेच भाजपचं ऑपरेशन लोटस सुद्धा यशस्वी होताना पहायला मिळाले. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशमधील भाजपला बळ मिळाले असून, आज शिंदे यांचे भोपाळमध्ये जोरदार स्वागत केले जाणार आहे.

शिंदे हे आज दुपारी तीनच्या सुमारास भोपाळला पोहचतील, येथून त्यांचा ताफा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पोहोचेल. या वेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते हजर असतील. तर शिंदे यांच्या स्वागतासाठी ठीक-ठिकाणी पोस्टर लावण्यात आली आहे. मात्र काही लोकांनी भोपाळच्या पॉलिटेक्निक चौकात लावण्यात आलेले पोस्टर फाडले असून, त्यावर शाईफेक सुद्धा केली आहे. त्यामुळे भोपाळमध्ये परतण्यापूर्वीच शिंदे यांना विरोध होताना पहायला मिळत आहे.

भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ सरकारवर निशाणा साधला. शिंदे म्हणाले की, 2018 मध्ये जे आश्वासने देऊन सरकार स्थापन केले गेले ते पूर्ण झाले नाही. तर काँग्रेसमध्ये आता नवीन नेतृत्व स्वीकारले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.