शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, 18 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 10:40 IST

सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश होणार असल्याचं निश्चित झालं आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. प्रथेनुसार न्या. रंजन गोगोई यांनी न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्यांच्या नियुक्ती पत्रावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केलं असून, न्या. बोबडे 47 वे सरन्यायाधीश होणार आहेत.न्या. गोगोई 17 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे न्या. बोबडे 18 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.न्या. बोबडे यांचे आजोबा अ‍ॅड. श्रीनिवास बोबडे ख्यातनाम वकील होते. वडील अरविंद बोबडे हे राज्याचे दोनदा महाधिवक्ता होते, तर ज्येष्ठ बंधू विनोद बोबडे सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते. न्या. बोबडे हे दुसरे नागपूरकर सरन्यायाधीश होतील. यापूर्वी नागपूरचे एम. हिदायतुल्ला यांची 25 फेब्रुवारी 1968 रोजी सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. न्या. बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात झाला. त्यांनी मुंबई उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांत यशस्वी युक्तिवाद केला. त्यांची 29 मार्च 2000 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.दोन वर्षांनंतर ते कायम न्यायमूर्ती झाले. ते 16 ऑक्टोबर 2012 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. त्यानंतर 12 एप्रिल 2013 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. न्या.बोबडे यांना सरन्यायाधीश म्हणून 523 दिवसांचा कार्यकाळ मिळेल. आतापर्यंत 46 पैकी 16 सरन्यायाधीशांनाच 500हून अधिक दिवसाचा कार्यकाळ मिळाला आहे. सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांना सर्वाधिक 870 दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय