शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

न्या. शरद बोबडे होणार सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 06:04 IST

न्या. गोगोई यांची शिफारस : १८ नोव्हेंबर रोजी शपथ घेण्याची शक्यता

नागपूर : सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश होणार आहेत. ते मूळचे नागपूरचे आहेत. प्रथेनुसार न्या. रंजन गोगोई यांनी न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर न्या. बोबडे ४७ वे सरन्यायाधीश होतील.

न्या. गोगोई १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे न्या. बोबडे १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. न्या. बोबडे यांचे आजोबा अ‍ॅड. श्रीनिवास बोबडे ख्यातनाम वकील होते. वडील अरविंद बोबडे हे राज्याचे दोनदा महाधिवक्ता होते, तर ज्येष्ठ बंधू विनोद बोबडे सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते. न्या. बोबडे हे दुसरे नागपूरकर सरन्यायाधीश होतील. यापूर्वी नागपूरचे एम. हिदायतुल्ला यांची २५ फेब्रुवारी १९६८ रोजी सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती.

न्या. बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपुरात झाला. त्यांनी मुंबई उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांत यशस्वी युिक्तवाद केला. त्यांची २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. दोन वर्षांनंतर ते कायम न्यायमूर्ती झाले. ते १६ आॅक्टोबर २०१२ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. त्यानंतर १२ एप्रिल २०१३ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. न्या.बोबडे यांना सरन्यायाधीश म्हणून ५२३ दिवसांचा कार्यकाळ मिळेल. आतापर्यंत ४६ पैकी १६ सरन्यायाधीशांनाच ५०० हून अधिक दिवसाचा कार्यकाळ मिळाला आहे. सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांना सर्वाधिक ८७० दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता.न्या. ललित, न्या. गवई यांनाही संधीविदर्भातील न्या. उदय ललित हे २७ आॅगस्ट २०२२ रोजी सरन्यायाधीश होऊ शकतील. तसेच न्या. भूषण गवई १४ मे २०२५ रोजी सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे.

गाजलेले न्यायनिवाडेन्या. शरद बोबडे यांचा समावेश असलेल्या न्यायपीठाने दिलेले अनेक न्यायनिवाडे गाजले. आधार कार्ड नसलेल्या भारतीय नागरिकांना मूलभूत सेवा व सरकारी अनुदानापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही हा त्यापैकी एक. दिल्लीतील प्रदूषण पाहून तिथे फटाके विक्रीला मनाई करण्याचा निर्णय त्यांनी दिला होता. २६ आठवड्याचा गर्भ जगण्याची शक्यता असल्याने एका महिलेची गर्भपाताची विनंती त्यांनी अमान्य केली. कर्नाटक सरकारने महादेवी वर्मा यांच्या पुस्तकावर धार्मिक भावना दुखावत असल्याच्या कारणावरून बंदी आणली होती. ती बंदी न्या. बोबडे यांच्या न्यायपीठाने योग्य ठरवली.