शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

न्यायमूर्र्तींनी ‘आक्षेपार्ह’ भाष्य काढून टाकले

By admin | Updated: December 20, 2015 00:13 IST

गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. जे.बी. परडीवाला यांनी अलीकडेच एका निकालपत्रात आरक्षणाचे धोरण आणि देशात बोकाळलेला भ्रष्टाचार याविषयी केलेल्या भाष्याबद्दल

अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. जे.बी. परडीवाला यांनी अलीकडेच एका निकालपत्रात आरक्षणाचे धोरण आणि देशात बोकाळलेला भ्रष्टाचार याविषयी केलेल्या भाष्याबद्दल त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची नोटीस राज्यसभेच्या ५८ सदस्यांनी दिल्यानंतर न्या. परडीवाला यांनी ते ‘आक्षेपार्ह’ भाष्य निकालपत्रातून काढून टाकले आहे.पाटीदार अमानत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांना अटक करताना गुजरात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचाही गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी हार्दिक पटेल यांनी केलेली याचिका फेटाळताना न्या. परडीवाला यांनी जे निकालपत्र दिले त्यात परिच्छेद क्र. ६२ मध्ये त्यांनी हे भाष्य नोंदविले होते. भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हा आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी लागू राहावे, अशी अपेक्षा होती; पण आज सहा दशके उलटली तरी आरक्षण अद्यापही सुरू आहे आणि देशातील विविध समाजवर्गांमध्ये त्यासाठी स्वत:ला मागास ठरवून घेण्याची स्पर्धा सुरू आहे, याविषयी न्या. परडीवाला यांनी या परिच्छेदात मुख्यत: खंत व्यक्त केली होती.न्या. परडीवाला यांच्या या निकालपत्राची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यावर काँग्रेस, जनदा दल (संयुक्त), कम्युनिस्ट पक्ष, द्रमुक आणि बहुजन समाज पक्षाच्या ५८ सदस्यांनी यावरून न्या. परडीवाला यांच्यावर अभियोग चालविला जावा, अशी मागणी करणारी नोटीस राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे सादर केली. या राज्यसभा सदस्यांचे म्हणणे असे होते की, राज्यघटनेत फक्त निवडणुकांमधील आरक्षण १० वर्षे ठेवण्याचा उल्लेख केला गेला होता. नोकरी व शिक्षणातील आरक्षणासाठी राज्यघटनेत अशा कुठल्याही कालमर्यादेचा उल्लेख नाही. राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊन न्यायाधीश या घटनात्मक पदावर बसलेल्या न्या. परडीवाला यांनी अधिकृतपणे निकालपत्र लिहिताना राज्यघटनेविषयीचे असे अज्ञान प्रकट करावे, हे गैरवर्तन आहे.सदस्यांनी दिलेल्या नोटिशीमधील आरोप संबंधित न्यायाधीशावर खरोखरच महाअभियोगाची कारवाई सुरू करण्याएवढे सकृत्दर्शनी गंभीर आहेत का याचा विचार करण्यासाठी राज्यसभा अध्यक्षांनी त्रिसदस्यीय समिती नेमणे हा याच्या पुढील टप्पा होता; परंतु त्याआधीच गुजरात सरकारने न्या. परडीवाला यांच्यापुढे निकालपत्रातील हा ‘आक्षेपार्ह’ परिच्छेद काढून टाकण्यासाठी अर्ज केला. या परिच्छेदातील भाष्य न्यायालयापुढील विवाद्य विषयाला सोडून असल्याने ते वगळले जावे, असे सरकारचे म्हणणे होते. हार्दिक पटेल यांच्या वकिलानेही यास विरोध न केल्याने न्या. परडीवाल यांनी मूळ निकालपत्रातून ६२ क्रमांकाचा हा संपूर्ण परिच्छेद वगळण्याचा आदेश शुक्रवारी दिला. (वृत्तसंस्था)निकालपत्र, महाभियोग अन् काही अनुत्तरित प्रश्नन्यायाधीशांनी न्यायदानाचे काम करताना केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही, अशा प्रकारचे संरक्षण देणारी तरतूद न्यायाधीश संरक्षण कायद्यात आहे. मग संसदेतील महाभियोग कारवाई यास आपवाद ठरते का?मुळात हार्दिक पटेल यांनी सुरू केलेले आंदोलन आरक्षणास विरोध करण्यासाठीच होते. मग त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यांचे विवेचन करताना न्यायाधीशांनी आरक्षणाविषयी केलेले भाष्य विषय सोडून कसे होते?गुजरात सरकारने भले अर्ज केला; पण तो मान्य करणे न्या. परडीवाला यांच्यावर बंधनकारक नव्हते. मात्र, त्यांनी तो केला. यावरून आपण मुळात चूक केली हे पटल्याने त्यांनी असे केले की, मतपरिवर्तन झाले म्हणून केले, असे समजायचे?याआधी फक्त दोन महाभियोगउच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा राज्यघटनेत महाभियोग हा एकमेव मार्ग दिलेला आहे. गेल्या सात दशकांत एकाही महाभियोगाची यशस्वी सांगता झालेली नाही. सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश न्या. व्ही. रामस्वामी यांच्याविरुद्धचा महाभियोग काँग्रेसने ऐनवेळी मतदानातून अंग काढून घेतल्याने १९९३ मध्ये बारगळला होता. २०११ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सौमित्र सेन यांच्याविरुद्धचा महाभियोग ठराव राज्यसभेत मंजूर झाला; परंतु तो लोकसभेत येण्यापूर्वीच न्या. सेन यांनी राजीनामा दिला होता.