देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी अद्यापही धोका टळलेला नाही. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचेही काही रुग्ण देशात सापडले आहे. लवकरच देशात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस उपलब्ध होण्यापूर्वी शनिवारी २ जानेवारी रोजी लसीचं ड्राय रन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ड्राय रनपूर्वी एक बैठक बोलावली होती. आरोग्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लसीकरणाची मोहीम ही एखाद्या निवडणुकीच्या तयारीप्रमाणे असल्याचं त्यांनी म्हटलं."जशी आपण निवडणुकांची तयारी करतो त्याच प्रमाणे आपल्या सर्व वैद्यकीय टीमच्या प्रत्येक सदस्याला जबाबदारीनं प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर दोन हजार मास्टर्स ट्रेनर्स असतील. देशातील राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये याबाबत प्रशिक्षण दिलं जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एका निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच आहे. जिथे एका बूथवर सर्व टीमना प्रशिक्षण दिलं जातं," असं डॉ. हर्षवर्धन म्हणाले. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची एक यादी तयार करण्यात आली असून ती कोविड प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.
कोरोना लसीकरण मोहीम निवडणुकांच्या तयारीप्रमाणे, आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार : डॉ. हर्षवर्धन
By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 17:07 IST
२ जानेवारीच्या 'ड्राय रन'पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी बोलावली होती समीक्षा बैठक
कोरोना लसीकरण मोहीम निवडणुकांच्या तयारीप्रमाणे, आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार : डॉ. हर्षवर्धन
ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी तयार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती 'ड्राय रन'पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी बोलावली होती समीक्षा बैठक