शिमला : येथून ९५ किमी अंतरावरील बिलासपूरजवळ राईया येथे बुधवारी सकाळी एक बस गोविंदसागर जलाशयात कोसळून किमान २५ जण मृत्युमुखी पडले तर १७ जण अद्याप बेपत्ता आहेत.बिलासपूरचे उपायुक्त अजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १५ जखमींना बिलासपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. ४० आसनी ही अपघातग्रस्त बस प्रवाशांनी पूर्ण भरली होती. काही प्रवासी छतावरही बसले होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी आणि मजुरांचा समावेश आहे. हे लोक नियमितपणे ऋषिकेश ते बिलासपूर येणेजाणे करीत असतात. बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
बस जलाशयात कोसळली
By admin | Updated: September 25, 2014 03:01 IST