संपुआचे आर्थिक धोरण मूठभर लोकांच्याच हिताचे- जेटली फेरआढावा घेणार : हस्तक्षेपाची बाब गंभीर- जावडेकर
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
नवी दिल्ली : यापूर्वीच्या संपुआ सरकारने काही मूठभर लोकांच्या भल्यासाठी भांडवलवादी तर उर्वरित लोकांसाठी पीडादायक असे आर्थिक धोरण अवलंबले होते. जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवर केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांकडे नव्याने लक्ष घालण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
संपुआचे आर्थिक धोरण मूठभर लोकांच्याच हिताचे- जेटली फेरआढावा घेणार : हस्तक्षेपाची बाब गंभीर- जावडेकर
नवी दिल्ली : यापूर्वीच्या संपुआ सरकारने काही मूठभर लोकांच्या भल्यासाठी भांडवलवादी तर उर्वरित लोकांसाठी पीडादायक असे आर्थिक धोरण अवलंबले होते. जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवर केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांकडे नव्याने लक्ष घालण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.संपुआ सरकारच्या काळात मंजुरी देण्यात आलेल्या किंवा नाकारण्यात आलेल्या प्रकल्पांचा फेरआढावा घेतला जावा. नटराजन यांनी केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांमध्ये वैधानिक किंवा नियमानुसार अपरिहार्यतेचा विचार केला गेलेला नाही. केवळ काँग्रेसचा आणि या पक्षाच्या नेत्यांचा विचार करूनच निर्णय घेतले गेले. केवळ कायदा आणि नियमानुसारच प्रकल्पांना मंजुरी द्यायला हवी, त्यासाठी पर्यावरण मंत्रालय मंजुरी देण्यात आलेल्या आणि नाकारण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांचा विचार करेल, अशी मला आशा आहे, असेही जेटलींनी नमूद केले. ----------------------------फायलींचा फेरआढावा घेणार- जावडेकरएखाद्या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी विशिष्ट प्रकारची विनंती केली जात असल्यास ती गंभीर बाब आहे. माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी बाह्य दबावाचा केलेला आरोप पहाता मी संबंधित फायलींचा फेरआढावा घेणार आहे, असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. नटराजन यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्यावर हस्तक्षेपाचा केलेला आरोप गंभीर आहे. पर्यावरण मंत्री या नात्याने माझी बाह्य प्रभावाबद्दल आरोप असलेल्या विशिष्ट फायलींची पुन्हा आढावा घेण्याची जबाबदारीच आहे, असेही त्यांनी नमूद केले.