शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुलै ठरला सर्वाधिक उष्ण; अमेरिका- युरोप होरपळला, कॅनडात वणवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 06:05 IST

यंदा जुलै महिन्याची सर्वाधिक उष्ण महिना म्हणून नोंद होणार असल्याचे शास्त्रज्ञांंनी म्हटले. याआधी जुलै २०१९ हा सर्वांत जास्त उष्ण महिना समजला जात असे.

नवी दिल्ली : यंदा जुलै महिन्याची सर्वाधिक उष्ण महिना म्हणून नोंद होणार असल्याचे शास्त्रज्ञांंनी म्हटले. याआधी जुलै २०१९ हा सर्वांत जास्त उष्ण महिना समजला जात असे. कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस तसेच जागतिक हवामानशास्त्र संघटना (डब्ल्यूएमओ) या संघटनांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला. हवामान बदलामुळे यंदा जुलैमध्ये सर्वाधिक उष्णतामान असून हरित वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण तातडीने कमी करणे आवश्यक आहे, असे डब्ल्यूएमओचे महासचिव पेटेरी तालास यांनी म्हटले आहे.

यंदा जुलै महिन्यात उत्तर अमेरिका, आशिया, युरोप येथे उष्णतेच्या लाटा आल्या. कॅनडा, ग्रीसमध्ये भयंकर वणवे लागले. यामुळे जगभरात उष्णतामान वाढल्याचे व त्याचे विविध देशांतील लोकांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. यंदाच्या जुलैच्या २३ तारखेपर्यंत जगातील सरासरी तापमान १६.९५ अंश सेल्सियस होते. जुलै २०१९ मध्ये सरासरी तापमान १६.६३ अंश सेल्सियस नोंदविले होते. (वृत्तसंस्था) 

‘ग्लोबल वॉर्मिंग’ नव्हे, ‘ग्लोबल बॉइलिंग’

‘ग्लोबल वॉर्मिंग’चा काळ संपून आता ग्लोबल ‘बॉईलिंग’ सुरू झाले  आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात वाढलेले उष्णतापमान हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले चिन्ह नाही.   - अँटोनिओ गुटेरेस,     महासचिव, संयुक्त राष्ट्रे