शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांना ३० टक्के पगारवाढ; दोन वर्षाची थकबाकीही मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:41 IST

देशभरातील सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाने ३० टक्के पगारवाढ मंजूर केली असून, त्यांना दोन वर्षांच्या वाढीव पगाराची थकबाकीही देण्याचा आदेश दिला आहे.

नवी दिल्ली : देशभरातील सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाने ३० टक्के पगारवाढ मंजूर केली असून, त्यांना दोन वर्षांच्या वाढीव पगाराची थकबाकीही देण्याचा आदेश दिला आहे.केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर न्यायिक अधिकाºयांचे सुधारित वेतन व भत्ते ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने निवृत्त न्यायाधीश न्या. पी. व्यंकटराम रेड्डी व ज्येष्ठ वकील आर. बसंत यांची समिती नेमली होती.या समितीने अंतरिम पगारवाढीच्या संदर्भात दिलेला अहवाल न्या. जस्ती चेलमेश्वर व न्या. संजय कृष्ण कौल यांच्या खंडपीठाने मंजूर केला आणि सर्व राज्यांनी त्याची अंमलबजावणी करावी, असा आदेश दिला.त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, महानगर दंडाधिकारी सत्र न्यायाधीश, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश यासह सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायिक अधिकाºयांना १ जानेवारी २०१६ पासूने मूळ वेतनात ३० टक्के वाढ मिळेल. मात्र वाढीव वेतनावर त्यांना महागाईभत्ता मिळणार नाही.वाढीव दराने वेतन १ मे २०१८ पासून दिले जावे आणि वाढीव वेतनाची १ जानेवारी २०१६ पासूनची थकबाकी ३० जून २०१८ पर्यंत द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. निवृत्त न्यायिक अधिकाºयांना मिळणारे पेन्शन व दिवंगत न्यायिक अधिकाºयांच्या कुटुंबीयांना मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन यांतही ३० टक्के वाढ करण्यात आली असून, त्यांनाही दोन वर्षांची थकबाकी मिळेल.जी अंतिम पगारवाढ ठरेल, तिच्या अधीन राहून अंतरिम वेतनवाढ दिली जात आहे. ती अंतिम पगारवाढीत ‘अ‍ॅडजस्ट’ केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. महाराष्ट्रातही अंतरिम पगारवाढ लागू करूआणि अंतिम पगारवाढीचे जे आदेश दिले जातील त्याचेही पालन करू, असे आश्वासन राज्य सरकारने न्यायालयास दिले.नवी पेन्शन योजना रद्दराज्यातील न्यायाधीशांची रिकामी पदे, न्यायालयांमधील अपुºया सोयी-सुविधा व न्यायाधीशांचे पगार व पेन्शन यासंबंधी पुण्यातील एक सीए विहार दुर्वे यांची उच्च न्यायालयात केलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वत:कडे वर्ग केली होती. त्यातील पगाराचा मुद्दा वगळून इतर मुद्द्यांवर निर्णयासाठी याचिका पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठविली गेली.याच याचिकेत उच्च न्यायालयाने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाºयांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला होता. या पेन्शन योजनेसाठी न्यायिक अधिकाºयांच्या पगारातून दरमहा कापून घेतलेली १० टक्के रद्दक त्यांना व्याजासह परत करण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने दिला होता.याविरुद्ध राज्य सरकारने अपील केले होते. उच्च न्यायालयाचा निकाल रद्द न करता अपीलही निकाली काढले गेले. त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमलेल्या न्यायिक अधिकाºयांना नवी पेन्शन योजना नको असेल, त्यांना ती नाकारण्याचा पर्याय उपलब्ध होईल आणि त्यापोटी कापून घेतलेली रक्कम त्यांना परत मिळेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय