शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

न्यायाधीशांचे म्हणणे योग्य, पण... सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:31 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे आरोप केले, ते पाहता सर्वोच्च न्यायालयाला कोणीतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ध्वनित होत आहे. सर्वोच्च न्यायालय हे नियंत्रणमुक्तच असले पाहिजे. सरकारनेही असे प्रयत्न करण्यापासून लांब राहायला पाहिजे, असे मत प्रख्यात कायदेतज्ज्ञ राजीव धवन यांनी व्यक्त केले.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे आरोप केले, ते पाहता सर्वोच्च न्यायालयाला कोणीतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ध्वनित होत आहे. सर्वोच्च न्यायालय हे नियंत्रणमुक्तच असले पाहिजे. सरकारनेही असे प्रयत्न करण्यापासून लांब राहायला पाहिजे, असे मत प्रख्यात कायदेतज्ज्ञ राजीव धवन यांनी व्यक्त केले.माजी कायदामंत्री अश्विनी कुमार म्हणाले की, भारताच्या इतिहासातील हा दु:खद दिवस आहे. न्यायालयातील घटना सांगण्यासाठी न्यायाधीशांना बाहेर यावे लागले. सरन्यायाधीश प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक उपाय करतील, असा विश्वास मला आहे.ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ इंदिरा जयसिंह म्हणाल्या की, न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे घटनात्मक पेचप्रसंग उद्भवणार नाही. किंबहुना लोकशाही अधिक बळकट होईल. न्यायालयाच्या कारभारातील पारदर्शकता यामुळे वाढेल व जनतेचा न्याययंत्रणेवरील विश्वासही अधिक दृढ होईल. या न्यायाधीशांनी व्यवस्थेबद्दलचे आपले आक्षेप मांडले आहेत. ही व्यवस्था दुरुस्त करणे शक्य आहे.नामवंत कायदेतज्ज्ञ के. टी. तुलसी म्हणाले की, कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळेच या चार न्यायाधीशांची पत्रकार परिषद घेतली आहे. या न्यायाधीशांवर ही पाळी का आली याचाही विचार होणे आवश्यक आहे. अ‍ॅड. जयवीर शेरगिल म्हणाले की, न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाची विश्वासार्हता टिकून राहावी म्हणून आता योग्य पावले उचलली जायला हवीत. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी आशा सामान्य माणूस मनात बाळगून असतो. त्याच न्यायालयात असे प्रकार घडायला लागले तर मग विश्वासार्हतेच्या ठिकºया उडायला वेळ लागणार नाही.आज निघेल तोडगासर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणे योग्य नव्हते. त्यांनी पत्रकार परिषद घेणे टाळायला हवे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये जो वाद उत्पन्न झाला आहे त्यावर शनिवारपर्यंत नक्की तोडगा निघेल.- के. के. वेणुगोपाल, अ‍ॅटर्नी जनरलपद्धत चुकीचीन्यायाधीशांनी जे मुद्दे मांडले ते बरोबर आहेत. मात्र त्या मुद्द्यांचे निराकरण ज्या पद्धतीने व्हावे असे या न्यायाधीशांना वाटते ती पद्धत चुकीची आहे. प्रसारमाध्यमांसमोर जाण्याचा पत्करलेला मार्ग योग्य नाही. कुटुंबातील भांडणे रस्त्यावर आणण्याचे काहीही कारण नव्हते.- एन. संतोष हेगडे,माजी सॉलिसिटर जनरलमी उद्विग्न झालोयचार न्यायाधीशांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या घटनेने मी उद्विग्न झालो आहे. हे पाऊल टाळता आले असते. अशा गोष्टींचे न्याययंत्रणेवर विपरीत परिणाम होऊ शकतात.- सोली सोराबजी,माजी अ‍ॅटर्नी जनरल

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय