डॉ.खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: पंजाबमधील एका न्यायाधीशाने दुसऱ्या न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली असून, चोरी करणाऱ्या न्यायाधीशांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. कंवलजीत सिंह हे सांगूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. १ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते. त्यांच्या निवासस्थानी कोणीही नव्हते.
याचा गैरफायदा घेत सिव्हिल जज (ज्युनियर डिव्हिजन) बिक्रमदीप सिंह रात्री ८:४५ दरम्यान त्यांच्या घरातील नोकर अमरजोत कौर उर्फ पिंकी, गौरव गोयल यांच्यासह कंवलजीत सिंह यांच्या घरी पोहोचले व त्यांनी बॅग्स, बॉक्सेस व पिशव्या भरून सामान नेले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, त्यांनी मौल्यवान वस्तू शोधून काढण्यासाठी ३० ते ४० मिनिटे घरात घालवली.
२१ मार्चला गुन्ह्याची नोंद
कंवलजीत सिंह यांच्या मुलातर्फे भूपिंदर सिंह विर्क यांनी दिलेल्या तक्रारीत लाखो रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात २१ मार्च २०२६ रोजी लाहोरी गेट (पटियाला) पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
...तो युक्तिवाद फेटाळला
बिक्रमदीप सिंह यांनी अटकपूर्व जामीन मागताना दिवंगत न्यायाधीशांचा मुलगा अंगदपाल सिंह (कॅनडामध्ये वकील) यांनी त्यांना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते, असे सांगितले. न्यायालयाने हे युक्तिवाद फेटाळले. न्यायिक पार्श्वभूमी व एफआयआरच्या विलंबाबाबतचे युक्तिवादही काेर्टाने अमान्य केले. ‘मृत सहकाऱ्याच्या घरातून सोने व दागिने काढून घेणे संशयास्पद परिस्थितीत घडले आहे म्हणत, पटियाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरिंदर सिद्धू यांनी जामीन नाकारला.
Web Summary : A judge in Punjab stole gold jewelry from a deceased colleague's home during his funeral. The accused judge's anticipatory bail was rejected after a complaint was filed alleging theft of valuables. He claimed the deceased's son asked him to secure the items, but the court dismissed his argument as suspicious.
Web Summary : पंजाब में एक न्यायाधीश ने अंतिम संस्कार के दौरान एक मृत सहयोगी के घर से सोने के आभूषण चुरा लिए। शिकायत दर्ज होने के बाद आरोपी न्यायाधीश की अग्रिम जमानत खारिज कर दी गई। उसने दावा किया कि मृतक के बेटे ने उसे सामान सुरक्षित रखने के लिए कहा था, लेकिन अदालत ने उसके तर्क को संदिग्ध बताकर खारिज कर दिया।