शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ विधेयकावरील जेपीसी बैठक संपली, सरकारच्या २२ सुधारणा मंजूर, विरोधकांना धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:50 IST

Waqf Amendment Bill : जेपीसीची पुढील बैठक २९ जानेवारी रोजी होणार आहे.

नवी दिल्ली : संसदेत मांडण्यापूर्वी वक्फ दुरुस्ती विधेयक जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या गेल्या काही महिन्यांपासून बैठक सुरू आहेत. आजही या वक्फ विधेयकावरील जेपीसीची बैठक पार पडली. या जेपीसीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या २२ दुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या. तर विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या. विरोधकांनी ४४ दुरुस्त्या मांडल्या होत्या, पण त्या सर्व फेटाळण्यात आल्या. 

जेपीसीची पुढील बैठक २९ जानेवारी रोजी होणार आहे. आज झालेल्या जेपीसी बैठकीतही गोंधळ झाला. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गोंधळ घातला होता.दरम्यान, वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संसदीय समितीच्या सदस्यांनी विधेयकाच्या मसुद्यात ५७२ दुरुस्त्या सुचवल्या होत्या. भाजप आणि विरोधी सदस्यांनी विधेयकात दुरुस्त्या मांडल्या आहेत. मात्र, ज्या सदस्यांनी दुरुस्ती मांडली त्यांच्या यादीत भाजपच्या कोणत्याही मित्रपक्षाचे नाव समाविष्ट नाही.

वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ हे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ८ ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले होते. त्यानंतर ते संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले होते. वक्फ मालमत्तेच्या नियमन आणि व्यवस्थापनातील समस्या आणि आव्हाने दूर करण्यासाठी वक्फ कायदा, १९९५ मध्ये दुरुस्ती करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे.

समिती ५०० पानांचा अहवाल सादर करू शकतेयेत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेपीसी आपला ५०० पानांचा अहवाल सादर करू शकते, असे म्हटले जात आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी बनवण्यात आलेल्या या समितीने दिल्लीत ३४ बैठका घेतल्या आहेत आणि अनेक राज्यांना भेटी दिल्या आहेत. यादरम्यान, समितीने दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, गुवाहाटी, भुवनेश्वर, कोलकाता, पाटणा आणि लखनौला भेटी दिली. समितीच्या २१ लोकसभा आणि १० राज्यसभेतील सदस्यांपैकी १३ सदस्य विरोधी पक्षांचे आहेत.

टॅग्स :Parliamentसंसदwaqf board amendment billवक्फ बोर्ड