शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

जोधपुरी कचोरी व मिरची भजी यांनी तोडल्या मतभेदाच्या सीमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 04:45 IST

एकमेकांविरोधात कितीही कडवी टीका केली असली तरी बाहेर आल्यावर ते एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारतात, विनोद करतात आणि एकत्र बसून खातातही.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : संसदेत अनेकदा एकमेकांवर आरोप व टीका करणारे विविध राजकीय पक्षांचे खासदार सभागृहातून बाहेर आल्यावर राजकीय मतभेद बाजूला ठेवतात. टीका, आरोप यांची कटुता कोणाच्याही मनात नसते. एकमेकांविरोधात कितीही कडवी टीका केली असली तरी बाहेर आल्यावर ते एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारतात, विनोद करतात आणि एकत्र बसून खातातही.असाच प्रकार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पाहायला मिळाला. अनेक खासदार सेंट्रल हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असताना माजी केंद्रीय मंत्री व राजस्थानचे खासदार पी. पी. चौधरी जोधपूरची खासियत असलेले कांद्याची कचोरी व मिरचीची भजी घेऊ न तिथे पोहोचले. त्यांनी हे खाद्यपदार्थ खासदारांच्या समोर ठेवले. त्या टेबलावर राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, खा. हेमामालिनी, खा. सुप्रिया सुळे आणि खा. कार्ती चिदम्बरम बसले होते. मनसोक्त गप्पा मारत या साऱ्यांनी कचोरी व भज्यांवर ताव मारला. खा. चौधरी तेवढ्यावरच थांबले नाहीत. अन्य टेबलांवरही त्यांनी कचोरी व भजी नेली. त्यापैकी एका टेबलापाशी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, खा. सुरेंद्र नागर व अन्य खासदार बसले होते. काही पत्रकारही सोबत होते.बारीक कांदा आणि मोठाली मिरची- जोधपूरची कांद्याची कचोरी व मिरचीची भजी जगभर प्रसिद्ध आहेत. सामान्य कचोरीच्या दुप्पट आकाराच्या असतात या कचोºया.- या कचोऱ्यांच्या मसाल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालतात. त्यामुळे त्या अतिशय खमंग असतात. एक कचोरी खाल्ली तरी पोट भरते.- मिरची भजीही जोधपूरचे वैशिष्ट्य. या मिरच्या नेहमीच्या मिरच्यांच्या दुप्पट आकाराच्या असल्या, तरी तिखट मात्र नसतात.- भरपूर बेसनात भिजवलेली ही भजी सध्याच्या थंडीत खूपच मस्त वाटतात.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाSupriya Suleसुप्रिया सुळेHema Maliniहेमा मालिनी