शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:08 IST

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजस्थानमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुचामन येथील शासकीय रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीदरम्यान महिलेच्या पोटात १५x१० आकाराचा टॉवेल डॉक्टरांकडूनच राहिल्याची भयंकर घटना घडली. प्रसूतीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जुलैनंतर जवळपास ३ महिने महिलेला पोटदुखीचा त्रास होत होता. पण कोणत्याच डॉक्टरला यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. 

अजमेरमध्ये सीटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी पोटात गाठ असल्याचं निदान केलं होतं. प्रचंड वेदना होत असलेली महिला आणि कुटुंबीय हे शेवटी एम्स जोधपूरला पोहोचले. जिथे शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांनी सीटी स्कॅननंतर आतमध्ये काहीतरी वेगळंच असल्याचं सांगितलं. ऑपरेशन दरम्यान वापरलेला टॉवेल पोटात असलेला पाहून एम्सच्या डॉक्टरांनाही धक्का बसला. टॉवेल आतड्यांना चिकटला होता.

महिलेने तीन महिन्यांपासून अनेक औषधं घेतली होती. त्यामुळे तिच्या शरीराच्या इतर भागांनाही इजा झाली आहे. या प्रकरणी डिडवाना सीएमएचओने तपासासाठी तीन डॉक्टरांची समिती गठित केली होती पण कुटुंब समाधानी नाही. त्यामुळे त्यांनी आता न्यायासाठी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असल्याचे महिलेचे वकील रज्जाक हैदर यांनी सांगितले. कुचामन येथील रहिवासी असलेल्या महिलेला पोटदुखीमुळे अन्न खाणं शक्य नाही. आतडे खराब झाल्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. एम्सच्या डॉक्टरांनी पीडितेला पुढील तीन-चार महिने लिक्विड आहारासोबत हलका आहार घेण्याचा सल्ला दिला आहे.

जोधपूर एम्स रुग्णालयातील गॅस्ट्रो सर्जरीचे डॉ.सुभाष सोनी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सेल्वन कुमार, डॉ.वैभव वैष्णवी, डॉ.पीयूष वैष्णवी आणि डॉ.लोकेश अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली. महिलेच्या आतड्यांमधून बाहेर आलेला टॉवेल टाकण्यासाठी कुटुंबाकडून प्लास्टिकचा बॉक्स मागवण्यात आला. डॉक्टरांनी टॉवेलचा एक तुकडा घेऊन तो तपासणीसाठी पाठवला आहे जेणेकरून त्यात ३ महिन्यांत वाढणारे बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी तपासता येतील. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर