शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीदिवशीच हातात नोकरी! ७५ हजार तरुणांना दिली नियुक्तिपत्रे; दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 06:51 IST

Jobs : कोविड-१९ साथीनंतर अनेक देशांना भेडसावत असलेल्या आर्थिक संकटातून भारताला वाचविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : १० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळाव्या’चा प्रारंभ केला. पहिल्या टप्प्यात ७५ हजार युवकांना नोकरीची नियुक्तिपत्रेही त्यांनी यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वितरित केली. कोविड-१९ साथीनंतर अनेक देशांना भेडसावत असलेल्या आर्थिक संकटातून भारताला वाचविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

मेळाव्यास मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. हा मेळावा एक महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले. तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्यासाठी सरकार आठ वर्षांपासून काम करीत असल्याचे नमूद केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये सरकारची विविध खाती आणि मंत्रालयांना आगामी दीड वर्षात १० लाख लोकांची भरती करण्याची सूचना केली होती.

कोणत्या विभागात दिल्या नोकऱ्या? ज्या ७५ हजार लोकांना मोदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली, ते भारत सरकारच्या ३८ मंत्रालये व विभागांत रुजू होतील. गट अ व ब (सनदी), गट ब (बिगर सनदी) आणि गट क अशा विविध पातळ्यांवर ते काम करतील. त्यांना केंद्रीय सशस्त्र दलांचे जवान, उपनिरीक्षक, हवालदार, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक आणि एमटी अशा विविध पदांवर घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यातील काहींना थेट मंत्रालये आणि विभागांनी भरती केले आहे. काहींच्या नियुक्त्या यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे भरती बोर्डामार्फत केल्या गेल्या आहेत.

रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक नाेकऱ्यापंतप्रधानांनी यावेळी देशातील तरुणांसाठी राेजगार मेळाव्याचे उद्घाटन करून लाखाे तरुणांसाठी एक दालन उघडले आहे. पुढील १४ महिन्यांमध्ये केंद्र सरकारच्या ३८ विभागांमधील १० लाख रिक्त पदांसाठी भरती हाेणार आहे. ही भरती काेणत्या स्तरांसाठी आणि काेणत्या खात्यात हाेणार आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया.     

कोविड-१९ साथीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नाही, ही वस्तुस्थिती आहे. कित्येक मोठ्या अर्थव्यवस्था संघर्ष करीत आहेत. कित्येक देशांत महागाई आणि बेरोजगारी शिखरावर आहे. शतकातून एखाद्या वेळी येणाऱ्या साथीचे परिणाम १०० दिवसांत जात नाहीत. या संकटापासून आपल्या देशाला वाचविण्यासाठी सरकार नवीन पुढाकार घेत आहे. हे आव्हानात्मक काम आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरी