शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या निकालावर कन्हैय्या कुमारचा 'शायराना अंदाज', पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:44 IST

आम आदमी पक्षाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. दिल्लीतील निवडणुकीत जेएनयुतील मारहाण

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे, केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. आपच्या विजयानंतर देशभरातून अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे कौतुक होत आहे. 

आम आदमी पक्षाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. दिल्लीतील निवडणुकीत जेएनयुतील मारहाण आणि शाहिनबाग हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे भाजपानेही देशभक्ती आणि देशद्रोही असा प्रचार निवडणुकीच्या रिंगणात केल्याचं दिसून आलं. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिष्ट नेते कन्हैय्या कुमार यांनीही दिल्लीतील विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, मोघम स्वरुपात प्रतिक्रिया देताना, दिल्लीतील जनतेबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. कारण, कन्हैय्या कुमारने आपल्या ट्विटमध्ये कुठेही अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले नाही, वा त्यांना शुभेच्छाही दिल्या नाहीत. मात्र, त्यांच्या ट्विटचा रोख हा दिल्ली निकालाकडे होता हे स्पष्ट दिसत आहेत. कारण, दिल्ली विधानसभेच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच त्यांनी ट्विट केलं आहे. ये दिल्ली है मेरे यारबस इश्क, मोहब्बत, प्यार  अशा शायराना अंदाजात कन्हैय्याने दिल्लीच्या निकालावर भाष्य केलंय.  

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीमधे आम आदमी पार्टीला (आप) लोकांनी पुन्हा संधी देऊन विकासाला मत दिले असून, धार्मिक कटुता पसरविणाऱ्या प्रचाराला ठोकरले आहे. भारतीय जनता पार्टी ही आपत्ती असल्याचे लोकांना पटले असून त्यांच्या पराभवाची मालिका थांबेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त होती. देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपचे कौतुक करत अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकkanhaiya kumarकन्हैय्या कुमारdelhiदिल्लीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल