शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूतील वसतिगृहांची भल्या पहाटे झाडाझडती, मुलींच्या खोल्यांमध्ये घुसले सुरक्षा रक्षक, विद्यार्थ्यांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:10 IST

विद्यापीठ प्रशासनाने जेएनयू विद्यापीठ परिसरातील वसतिगृहातील खोल्यांची झाडाझडती घेतल्याने विद्यार्थी संतापले असून, हा प्रकार म्हणजे संशोधनार्थी विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

नवी दिल्ली : विद्यापीठ प्रशासनाने जेएनयू विद्यापीठ परिसरातील वसतिगृहातील खोल्यांची झाडाझडती घेतल्याने विद्यार्थी संतापले असून, हा प्रकार म्हणजे संशोधनार्थी विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका अधिव्याख्यासह सुरक्षारक्षकांनी मुले आणि मुलींच्या खोल्यांची झाडाझडती घेतली, असा आरोप आहे.मुलांच्या खोलीत अनेक मुली आढळल्याचे वृत्तपत्राच्या ठळक बातम्यांत म्हटले आहे. जेएनयूचे अधिव्याख्याता बुद्ध सिंह यांच्या नेतृत्वाखाली २० ते २५ सुरक्षारक्षकांनी ५ आॅक्टोबर रोजी मुलीच्या वसतिगृहासह विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहात घुसून झडती घेतली, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. कुलगुरू व रजिस्ट्रार यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही.विद्यापीठ परिसरातील विविध वसतिगृहांचे अधीक्षकही छापा घालण्यास आले होते. वसतिगृहाच्या अधीक्षकांनी आत घुसण्याआधी दरवाजे ठोठावण्याचे सौजन्यही दाखविले नाही, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी सरचिटणीस सतरूपा चक्रवर्ती यांनी म्हटले आहे. मुली झोपत असताना त्यांच्या खोल्यांत घुसून धाडी घातल्या, असा आरोपही त्यांनी केला. कपाटे उघडण्यात आली आणि नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जागीच दंडही ठोठावला.मागील वर्षापासून विद्यापीठ प्रशासनाकडून असले प्रकार होत आहेत. जेएनयूविरुद्ध द्वेषभावनेला चिथावणी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस दुग्गीरला श्रीकृष्ण यांनी म्हटले आहे. धाडींविषयी वसतिगृहाच्या निर्वाचित पदाधिकाºयांना का अंधारात ठेवण्यात आले, अशी विचारणा करणारा ठराव पेरियार वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांनी केला आहे.हा सामाजिक दहशतवादअ. भा. विद्यार्थी परिषदेनेही या धाडीबद्दल विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार केला आहे. वसतिगृह तपासणीच्या नावाखाली विद्यापीठ प्रशासन नैतिकता रक्षणाचा आव आणून असला अत्याचार करीत आहे, असे अभाविपने म्हटले आहेत. जेएनयू टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा आयेशा किडवाई यांनी हा प्रकार सामाजिक दहशतवाद असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीuniversityविद्यापीठ