शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

J&K Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये एनकाउंटर, सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांची घेराबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 08:40 IST

J&K Encounter: कुलगाममध्ये मध्यरात्रीपासून गोळीबार सुरू आहे. शुक्रवारी अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे 3 दहशतवादी ठार झाले होते.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कुलगामच्या देवसर परिसरात पोलीस आणि लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा दलाच्या घेराबंदीत जैश-ए-मोहम्मदचे 2 ते 3 दहशतवादी अडकले आहेत. सध्या या चकमकीबाबत लष्कराकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, रात्री उशिरापासून गोळीबार सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली. शहरातील सफाकदल भागातील आयवा पुलाजवळ ही घटना घडली. सकाळी 8.40 च्या सुमारास जम्मू-काश्मीर पोलिसांचे कॉन्स्टेबल गुलाम हसन यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

3 हिजबुल दहशतवादी ठारमागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांची कारवाई सुरूच आहे, जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे 3 दहशतवादी मारले गेले. जिल्ह्यातील पहलगाम भागातील श्रीचंद वनक्षेत्रात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी तिथं घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, सुरक्षा दलांनी त्याला प्रत्युत्तर देत तिघांचा खात्मा केला. 

200 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात नॉर्दर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले होते की, खोऱ्यातील घुसखोरीमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र असे असतानाही 200 दहशतवादी सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. खोऱ्यातील अंतर्गत भागात सध्या 40 ते 50 स्थानिक दहशतवादी आणि विदेशी दहशतवादी सक्रिय आहेत. सुरक्षा जवानांनी आतापर्यंत 21 विदेशी दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय आणि पाठिंबा दिवसेंदिवस कमी होत असल्याची माहितीही द्विवेदी यांनी दिली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी