शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कथुआ बलात्कार ही छोटी घटना, जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 21:44 IST

जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कविंद्र गुप्ता यांनी कथुआची घटना छोटी असल्याचं सांगत नव्या वादाला फोडणी दिली आहे.

जम्मू-काश्मीर- गेल्या काही दिवसांपासून कथुआ बलात्काराच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेतल्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला होता. आता जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कविंद्र गुप्ता यांनी कथुआची घटना छोटी असल्याचं सांगत नव्या वादाला फोडणी दिली आहे. ते म्हणाले, कथुआ प्रकरण न्याय प्रक्रियेत असल्यानं त्यावर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल. सारखा सारखा एकच विषय काढणं योग्य नाही. जाणूनबुजून हे प्रकरण पुढे आणलं जातंय, अशा लहान प्रकरणांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री कविंद्र यांच्या या वादग्रस्त विधानानं विरोधकांना भाजपाला घेरण्याची आयतीच संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपानं जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता यांना मंत्री बनवलं आहे. वयाच्या 13व्या वर्षापासूनच कविंदर गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय आहेत. ते सलग तीन वेळा (2005 ते 2010) जम्मूचे महापौर होते. 2014मध्ये ते पहिल्यांदाच गांधीनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. एकमताने त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मला पक्षाने जबाबदारी दिली आहे. समर्पित भावनेने मी जनतेची सेवा करीन. तसेच जनतेच्या मागण्या आणि आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, अशी खात्री उपमुख्यमंत्री गुप्ता यांनी दिली.