शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन घोटाळा करून राज्याला लुटले, उपमुख्यमंत्र्यांचा हुड्डांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 16:21 IST

दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

सिरसा : हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दुष्यंत चौटाला हे जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) अध्यक्ष आहेत. हरयाणामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दुष्यंत चौटाला यांनी आपल्या पार्टीचा पाठिंबा भाजपाला दिल्यामुळे भूपिंदर सिंह हुड्डा यांनी त्यांचावर निशाणा साधला होता. मात्र, याला प्रत्युत्तर देताना दुष्यंत चौटाला यांनी भूपिंदर सिंह हुड्डा मुख्यमंत्री असताना सीएलयू (चेंज ऑफ लँड यूज) च्या नावावर घोटाळा करून राज्याला लुटले, अशा शब्दात पलटवार केला आहे. 

दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी दुष्यंत चौटाला म्हणाले, "निवडणुकीत आम्ही भाजपाच्या बाजूने किंवा काँग्रेसच्या बाजूने मते मागितली नाहीत. आम्ही भाजपासोबत किंवा काँग्रेससोबत निवडणूक लढलो नाही. 18 लाख 60 हजार मतांनी जनतेने जननायक जनता पार्टीचे 10 आमदार निवडून दिले आहेत. आम्हाला जनतेचे हित पाहून निर्णय घ्याला लागेल. हरयाणामधील स्थीर सरकारसाठी आपल्याला पाऊल टाकणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही योग्य निर्णय घेतला."

याचबरोबर, ज्यावेळी भूपिंदर सिंह हुड्डा सरकारमध्ये होते. त्यावेळी सीएलयू (चेंज ऑफ लँड यूज) च्या नावावर घोटाळा केले आणि राज्याला लुटले, अशा शब्दांत भूपिंदर सिंह हुड्डा यांच्यावर दुष्यंत चौटाला यांनी टीका केली. 

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले. त्यामुळे भाजपाने जेजेपीचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी काल शपथविधी सोहळा पार पडला. या शपविधी सोहळ्याला भूपिंदर सिंह हुड्डा सुद्धा उपस्थित होते. यावेळी भूपिंदर सिंह हुड्डा यांनी भाजपाला जेजेपीने दिलेला पाठिंबा म्हणजे मतदारांनी दिलेल्या कौलाचा अपमान असल्याचे सांगत जेजेपीबाबत नाराजी व्यक्त केली.

भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले होते की, "ही युती म्हणजे मतदान कोणाचे तरी आणि पाठिंबा कोणाला तरी या आधारावर बनली आहे. हे सरकार स्वार्थावर आधारित आहे. जेजेपीने जनतेच्या कौलाचा अपमान केला आहे. आमच्या पार्टीत झालेल्या बदलांमुळे आमच्याकडे कमी कालावधी होता. जर हे बदल आधीच झाले असते तर याचा परिणाम यापेक्षा वेगळा असता."

दरम्यान, मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ  घेतली आहे. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर काल राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मनोहरलाल खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.  

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकHaryanaहरयाणा