शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

JIO : प्राईम मेंबरशिप न घेतल्यास काय होईल?

By admin | Updated: March 2, 2017 21:57 IST

आजपासून 31 मार्चपर्यंत जिओच्या प्राईम मेंबरशिप नोंदणीस सुरूवात

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओची मोफत सेवा 31 मार्चपासून संपुष्टात येणार आहे.  ही सुविधा संपल्यानंतर 1 एप्रिलपासून जिओची प्राईम मेंबरशिप सेवा सुरू होणार आहे. आजपासून (दि. 1)  31 मार्चपर्यंत यासाठी नोंदणी करता येणार आहे. 
 
या ऑफरनुसार ग्राहकांना 1 एप्रिल 2018 पर्यंत ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरचा लाभ घेता येईल. म्हणजे प्रत्येक दिवशी 1GB डेटा आणि मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची  प्राईम मेंबरशिप मिळवण्यासाठी जिओ युझरला 99 रूपये द्यावे लागतील. एका वर्षासाठी ही मेंबरशिप असेल. त्यानुसार 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.
 
जर प्राईम मेंबरशिप घेतली नाही तर काय होईल?
ग्राहकांना 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान प्राईम मेंबरशिपसाठी नोंदणी करता येणार आहे. जर तुम्ही मेंबरशिप घेतली नाही तर तुमचं जिओ सिम प्रीपेड किंवा पोस्टपेडमध्ये बदलण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावं लागेल. टेरिफ प्लॅननुसारही व्हॉईस कॉलिंग मोफत असेल मात्र, इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागतील. प्राईम मेंबरशिप न घेणा-यांना सप्टेंबर 2016 मध्ये जिओने लॉन्च केलेल्या टेरिफ प्लॅननुसार 50 रुपयात 1GB 4G डेटा, 999 रुपयात 10GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा), 1499 रुपयात 20GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा), 2499 रुपयात 35GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा) मिळेल. याउलट मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल. 
कशी मिळवायची प्राईम मेंबरशिप-
जिओच्या वेबसाईटवरून किंवा माय जिओ अॅपवरुन प्राईम मेंबरशिप मिळवता येईल. या व्यतिरिक्त जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल.