शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 3, 2021 15:43 IST

आता आम्ही बील परत घेण्याची मागणी केली आहे, गादी परत करण्याची मागणी झाली तर काय कराल? असा सवाल शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला केला आहे.

जिंद - हरियाणातील जिंद येथे होत असलेल्या महापंचायतीत तिन्ही कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यात कायदे परत घेणे, MSP तसेच शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी, आता आम्ही बील परत घेण्याची मागणी केली आहे, गादी परत करण्याची मागणी झाली तर काय कराल? असा सवाल शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला केला आहे.

टिकैत म्हणाले, "जेव्हा-जेव्हा राजा घाबरतो, तेव्हा-तेव्हा तटबंदी तयार करत असतो. दिल्लीत खिळे ठोकले जात आहेत, ते आम्ही आमच्या शेतताही लावतो. आता आम्ही बिल वापस घेण्याची मागणी केली आहे, जर गादी परत करण्याची मागणी केली तर काय कराल? तसेच सध्या जिंद वासीयांना दिल्लीकडे कूच करण्याची आवश्यकता नाही. आपण येथेच थांबा.

"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"

व्यासपीठ तुटले -हरियाणातील जिंदमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांची महापंचायतीच्या वेळी, येथे तयार करण्यात आलेले व्यासपीठ कोसळल्याची घटना घडली आहे. या व्यासपीठावर प्रमाणापेक्षा अधिक लोक चढले होते. यावेळी राकेश टिकैतदेखील व्यासपीठावर होते.

शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनात पुन्हा हिंसाचार?; गुप्तचर यंत्रणांनी मिळाली धक्कादायक माहिती

शेतकरी आंदोलन एक प्रयोगमध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, की हे शेतकऱ्यांचे आंदोलन एक प्रयोग आहे. जर हे यशस्वी ठरले, तर लोक सीएए-एनआरसी, कलम 370 आणि राम मंदिराच्या विरोधातही आंदोलन सुरू करतील. हे कुणालाही समजावता येईना, की कृषी कायद्यांमध्ये असे काळे काय आहे, ज्यांचा ते उल्लेख करत आहेत. एवढेच नाही, तर हे आंदोलन केवळ गृहितकांवरच आधारलेले आहे, असेही ते म्हणाले.

रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ -दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. बुधवारी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले, आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांची घोषणाबाजी आणि गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले.

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपrakesh tikaitराकेश टिकैतHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकार