नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणी येथील विशेष सीबीआय न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि इतर सातजणांना बुधवारी जामीन मंजूर केला. यात माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोककुमार बसू यांचाही समावेश आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांनी या सातही जणांचा जामीन अर्ज मंजूर केला. एक लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर या आठजणांची मुक्तता झाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ मार्चला होईल.तत्पूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपींच्या जामीन याचिकेला विरोध करताना या लोकांनी कोळसा खाणपट्टे वाटपात विनी आयरन अँड स्टील उद्योग लिमिटेड या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या पदाचा गैरवापर केला व कारस्थान रचले असा आरोप न्यायालयात केला होता.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना जामीन
By admin | Updated: February 19, 2015 01:37 IST