शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा दोषी, सीबीआय न्यायालय शुक्रवारी सुनावणार शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 05:20 IST

कोळसा घोटाळा प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांच्याबरोबरच माजी सचिव एच. सी. गुप्ता व आणखी चार जणांनाही दोषी दोषी ठरविले असून, न्यायालय उद्या शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहे.

नवी दिल्ली: कोळसा घोटाळा प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांच्याबरोबरच माजी सचिव एच. सी. गुप्ता व आणखी चार जणांनाही दोषी दोषी ठरविले असून, न्यायालय उद्या शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहे.निवडणूक आयोगाने आधी दिलेल्या एका दणक्यानंतर कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणीही मधू कोडा दोषी ठरले आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील हे प्रकरण आहे. अनियमित पद्धतीने कोळसा खाणीचे वाटप केल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला आहे. त्यात मधू कोडा व अन्य आरोपींना कट रचल्याबद्दल व भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे.मधू कोडा यांनी २00६ साली झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. एके काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय असणाºया मधू कोडा यांनी आॅल झारखंड स्टुडंट्स युनियनद्वारे आपला राजकीय प्रवास सुरू केला. मुख्यमंत्री होण्याआधी अपक्ष आमदार असलेले कोडा से बाबुलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र २00५ साली भाजपाने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले.त्या निवडणुकीमध्ये झारखंडमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला पाठिंबा दिला. मात्र नंतर तो काढून घेतला आणि काँग्रेस व अन्य आमदारांच्या मदतीने ते स्वत:च मुख्यमंत्री झाले होते.निवडणूक लढण्यास आधीच बंदीमधू कोडा यांना यापूर्वी निवडणूक आयोगाने दणका दिला होता आणि त्यांना तीन वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली होती. खर्चाचा योग्य हिशेब सादर न केल्याबद्दल आयोगाने हा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Courtन्यायालय