शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडच्या भूकबळीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:17 IST

आधार क्रमांकाशी जोडली न गेल्याने रेशन कार्डे रद्द करण्यात आली व धान्य मिळणे बंद झाल्याने झारखंडमध्ये भूकबळी गेले

नवी दिल्ली : आधार क्रमांकाशी जोडली न गेल्याने रेशन कार्डे रद्द करण्यात आली व धान्य मिळणे बंद झाल्याने झारखंडमध्ये भूकबळी गेले, असा दावा करणारी याचिका सुनावणीसाठी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे.सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस जारी केलेली नाही. मात्र, या याचिकेची एक प्रत केंद्र सरकारच्या वकिलाला द्यावी, असे न्यायालयाने याचिकादाराचे वकील कॉलिन घोन्साल्विस यांना सांगितले आहे. ही याचिका दोन आठवड्यानंतर सुनावणीसाठी येईल. अ‍ॅड. घोन्साल्विस यांनी सांगितले की, झारखंडमध्ये भूकबळी गेले त्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारने भरपाई द्यायला हवी.अकरा वर्षांच्या संतोषी नावाच्या मुलीची आई व बहिणीने कॉलिन घोन्साल्विस यांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखलकेली आहे. आधार क्रमांकाशी रेशन कार्ड जोडलेले नसल्याने झारखंडमधील गरीब दलित कुटुंबांना रेशनवर धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांना उपासमारी सहन करावी लागत आहे. त्यातूनच भूकबळीची प्रकरणे घडत आहेत. रेशन यंत्रणेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २००२साली एक महत्त्वाचा निकाल दिला होता. रेशनवर धान्य नाकारून अधिकाऱ्यांनी या निकालाचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत आहे. आधारची योजनेच्या वैधतेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलेले नाही, हे कॉलिन घोन्साल्विस यांनी स्पष्ट केले.

ही याचिका करणा-यांकडे सर्व कागदपत्रे आहेत, पण त्यांचे रेशन कार्ड आधार क्रमांकाशी जोडले गेलेले नाही. त्यामुळे ते रद्द करण्यात आले. नवे रेशन कार्ड आधारशी जोडले असले, तरी या कुटुंबाला मार्च २०१७ पासून रेशनवर धान्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांची मुलगी संतोषी सप्टेंबरमध्ये भूकबळी झाली, असा कुटुंबीयांचा दावा झारखंड सरकारने अमान्य केला होता. संतोषीचा मृत्यू आजारपणाने झाला, असे सरकारचे म्हणणे आहे. झारखंडप्रमाणेच कर्नाटक व उत्तर प्रदेशातही भूकबळी गेल्याचा दावा याचिकेत आहेत.