शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! कारखान्यातून अमोनिया गॅस गळती; कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास, परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 10:17 IST

Jhajjar Factory Ammonia Gas Leak: कात बनवणाऱ्या कारखान्यात अमोनिया गॅस (Ammonia Gas Leak) सिलिंडरमधून बाहेर पडणाऱ्या पाईपला गळती लागली होती. या गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नवी दिल्ली - हरियाणातील (Haryana) झज्जरमध्ये (Jhajjar) एक धक्कादायक घटना घडली आहे.  रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना (big accident) घडली. कात बनवणाऱ्या कारखान्यात अमोनिया गॅस (Ammonia Gas Leak) सिलिंडरमधून बाहेर पडणाऱ्या पाईपला गळती लागली होती. या गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, गॅस गळतीनंतर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, उलट्या होऊ लागल्या. याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कात बनवण्याच्या प्लांटमध्ये अमोनिया गॅसची गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ मदतीसाठी आले. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितलं. तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले असून आजूबाजूचा काही भाग पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. सुरू असलेली दुकानेही पोलिसांनी बंद करण्यास सुरुवात केली.

कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून कारखाना परिसरापासून सर्वांनाच दूर जाण्यास सांगण्यात आलं. अग्निशमन दलाच्या काही गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पाण्याचा फवारा मारला. कारखान्याच्या टाकीतून निघणाऱ्या पाईपमधून अमोनिया गॅसची गळती होत होती. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.