शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रोज तीन तास अभ्यास अन् बहिणीसोबत बुद्धिबळ... दिल्लीचा शुभम बनला JEE टॉपर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 11:13 IST

दिल्लीतला शुभम श्रीवास्तव टॉपर राहिला आहे.

नवी दिल्लीः देशातील आयआयटी व इंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन जानेवारी 2019 आणि जेईई मेन एप्रिल 2019 परीक्षेच्या सर्वोत्तम गुणांच्या आधारावर रँकिंग जारी केलं आहे. यात दिल्लीतला शुभम श्रीवास्तव टॉपर राहिला आहे. तर कर्नाटकातील केविन मार्टिन दुसरा, मध्य प्रदेशातील ध्रुव अरोडा तिसरा, पंजाबमधील जयेश सिंगला चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर टॉपर राहिलेल्या शुभम श्रीवास्तवनंही यशाचं रहस्य उलघडलं आहे.तो म्हणाला, मी कधीही विचार केला नव्हता की, सहज दिलेल्या या परीक्षेत टॉप करेन. आता माझा उद्देश जेईई अॅडवान्समध्ये चांगलं रँकिंग आणून दिल्ली किंवा मुंबईतल्या आयआयटीतून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक करण्याचा आहे. कॉम्प्युटर सायन्स हा माझ्या आवडीचा विषय आहे. जेईई परीक्षेची तयारी मी 10वीनंतर सुरू केली आहे. 11वीमध्ये त्यांनी एक कोचिंग क्लास ज्वॉइन केलं होतं. कोचिंग क्लासमधून आल्यानंतर तो दररोज तीन तास अभ्यास करायचा. जेईई मेन्स आणि सीबीएसईचा अभ्यास जवळपास सारखाच आहे. दोन्ही अभ्यासक्रमात जास्त प्रश्न हे एनसीईआरटीसंदर्भात विचारण्यात आले आहेत. अशातच त्याला 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करण्यात कोणतीही अडचण नाही. मी जास्त वेळ केमिस्ट्रीला दिली आहे.

अभ्यासादरम्यान ते मध्ये मध्ये बुद्धिबळही खेळतात. तसेच त्याला क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळणंही आवडतं. क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर त्याला आवडतात. वेळ मिळाल्यास भारताचे सामने बघत असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. तसेच मी आयपीएलही पाहतो, असंही तो म्हणाला आहे. शुभमचे वडील अनुप कुमार हे आयआयटीयन आहेत. ते एअर इंडियामध्ये कामाला होते. त्याची आई रुची या गृहिणी आहेत. तर बहीण ट्रिपल आयटीतून बीटेक करत आहे.