शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जदयू फुटीकडे, शरद यादव नाराज, वीरेंद्र सिंग यांचा केरळमध्ये वेगळा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:00 IST

महाआघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीच्या मदतीने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय पक्षामध्ये सहमतीने झाला होता. ज्यांना तो पटलेला नाही, ते आपला स्वत:चा निर्णय घेण्यास मोकळे आहेत, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी शुक्रवारी अप्रत्यक्षपणे संयुक्त जनता दलातून बाहेर पडण्याचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद यादव आणि त्यांच्या समर्थकांना दिला.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाआघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीच्या मदतीने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय पक्षामध्ये सहमतीने झाला होता. ज्यांना तो पटलेला नाही, ते आपला स्वत:चा निर्णय घेण्यास मोकळे आहेत, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी शुक्रवारी अप्रत्यक्षपणे संयुक्त जनता दलातून बाहेर पडण्याचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद यादव आणि त्यांच्या समर्थकांना दिला.त्यामुळे पक्षात फूट अटळ आहे. पक्षाचे केरळमधील राज्यसभा सदस्य वीरेंद्र कुमार यांनी यापूर्वीच नितीश यांचा निर्णय आपणास मान्य नसून, आपण केरळमध्ये प्रादेशिक पक्ष स्थापन करून तेथील काँग्रेस प्रणीत युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटमध्ये सहभागी होणार आहोत, असे जाहीर केले आहे.दुसरीकडे शरद यादव काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते नितीश कुमार यांच्याशी समझोता करण्याची चिन्हे नसल्याने ते बिहारमध्ये वेगळा पक्ष स्थापन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीश कुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि बिहारच्या विकासासाठी केंद्राने निधी द्यावा, अशी विनंती त्यांना केली. त्यानंतर दुपारी ते भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही भेटले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित होते.शरद यादव यांनी गुरुवारीच नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. महाआघाडीतून बाहेर पडून भाजपासमवेत सरकार बनवणे, ही बिहारमधील ११ कोटी जनतेशी गद्दारी आहे, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी यादव यांना तुमचा निर्णय घेण्यास तुम्ही मोकळे आहात, असेसुनावले. यादव हे संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे सदस्यही आहेत.अली अन्वर निलंबितविरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतल्याप्रकरणी जेडीयूचे नेते अली अन्वर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.